आकाशसम्राज्ञी बोईंग ७४७ ची पन्नाशी

boing
आकाशाची सम्राज्ञी अशी ओळख मिळविलेल्या अमेरिकन बोईंग कंपनीच्या सुप्रसिद्ध बोईंग ७४७ विमानाला ३० सप्टेंबरला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ३० सप्टेंबर १९६८ साली सियाटल येथील कारखान्यात हे विमान तयार झाले तेव्हा त्याची पहिली झलक पाहण्यसाठी सुमारे ५० हजार लोक आले होते. अतिप्रचंड आकारामुळे जम्बो जेट असे नाव या विमानाला मिळाले आणि हवाई वाहतूक इतिहासात हे विमान अतिशय यशस्वी ठरले आहे.

boeing7
बोईंगने पहिले महाकाय विमान १९५८ साली बनविले ते बोईंग ७०७. बोईंग ७४७ त्याच्यापेक्षा दुप्पट मोठे आहे. या विमानांमुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आले असे मानले जाते. दीर्घ काळाच्या हवाई प्रवासासाठी आजही अनेक विमान कंपन्याची या विमानाला सर्वाधिक मागणी आहे. अर्थात कालानुरूप त्याचे डिझाईन आणि तंत्र यात अनेक बदल केले गेले आहेत. ७ फेब्रुवारी १९६९ ला या विमानाने आकाशात पहिली झेप घेतली होती मात्र प्रवासी घेऊन या विमानाच पहिला प्रवास जानेवारी १९७० मध्ये न्यूयॉर्क ते लंडन असा झाला. कार्गो साठीही या विमानाची उपयुक्तता सिद्ध झाल्यामुळे जगभरातील अनेक विमान कंपन्यांनी या विमानांची हातोहात खरेदी केली आहे आणि अजूनही केली जात आहे.

Leave a Comment