फेसबुकची सुरक्षा यंत्रणा कमजोर झाल्याचा ५० दशलक्ष युजर्सना फटका

facebook
नवी दिल्ली – तब्बल ५० दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांच्या अकाऊंटवर फेसबुकची सुरक्षा यंत्रणा कमजोर झाल्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे हॅकर्स फेसबुक अकाऊंटवर पूर्णपणे ताबा मिळवू शकतात.

सुरक्षा यंत्रणेच्या फेसबुक सुरक्षा संदर्भात गोंधळ निर्माण झाल्याचे लक्षात आले. फेसबुकचा ‘व्हिव्ज अॅज’ या फिचरवर या बिघाडामुळे परिणाम झाला आहे. दरम्यान फेसबुक या बिघाडामागचे मुळ कारण शोधत आहे. पण हा तपास सध्या प्राथमिक स्तरावर आहे. या घटनेमागे कोणत्या हॅकर्सचा हात आहे, हे अद्याप समजू शकले नाही.

फेसबुकवर ‘कॅम्ब्रेज अॅनालिटीकाला’ युजर्सची माहिती पुरवल्याचा आरोपही आहे. त्यानंतर आता चक्क फेसबुकची सुरक्षा यंत्रणाच भेदण्यात आल्यामुळे फेसबुकवरचा विश्वास कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment