सबरीमला मंदिरातील अयप्पा बद्दल काही

sabari
द. भारतातील जगप्रसिद्ध सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आणि पुन्हा एकदा हे मंदिर चर्चेत आले. हे मंदिर ज्याला समर्पित आहे तो अयप्पा म्हणजे नक्की कोण याची माहिती मात्र अनेकांना नाही. अयप्पा हा विष्णू आणि शंकर यांचा मुलगा. त्यामागे अशी कथा आहे कि दुर्गेने महिषासुरवध केल्यानंतर त्याची बहिण महिषी हिने कडक उपासना करून तिला विष्णू व शंकर याच्या मुलाकडून मरण यावे असा वर मिळविला होता.

विष्णूने मोहिनी रूप धारण केले तेव्हा त्याचा रूपावर शंकर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यपात झाला त्यातून अयप्पा जन्मला. त्याला हरिहरन असेही नाव आहे त्याचप्रमाणे मणीनंदन असेही म्हटले जाते. हरि म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. तसेच विष्णू आणि शंकराने अयाप्पाचा जन्म झाल्यावर त्याच्या गळ्यात सोन्याचा एक मणी बांधून त्याला पंपा सरोवराजवळ ठेवले म्हणून तो मणीनंदन.

ayappa
या अयप्पाचे पालनपोषण पंडालचा राजा राजशेखर याने केले. त्याला मुलबाळ नव्हते. मात्र कालांतराने त्याच्या राणीला मुलगा झाला तेव्हा राणीला राजगादी आपल्या मुलाला मिळावी असे वाटू लागले. यासाठी तिने एक कट रचला आणि आजारी पडल्याचे सोंग करून अयप्पाला वाघाचे दुध आणले तरच आजार बारा होईल असे सांगून जंगलात पाठविले. तेथे प्रत्यक्षात महिषी राक्षशीकडून अयप्पाला ठार मारण्याचा कट होता मात्र प्रत्यक्षात अयाप्पानेच तिला ठार केले आणि वाघावर बसून तो परत आला. साऱ्या प्रजेने त्याचा जयजयकार केला आणि राजाला राणीने आखलेल्या कटाची माहिती मिळाली. राजाने त्याचे क्षमा मागितली.

त्यानंतर वडिलांना आपली आठवण कायम राहावी म्हणून अयाप्पाने साबरी पहाडावर त्याचे मंदिर बांधण्यास सांगून राज्यत्याग करून तो स्वर्गात परत गेला. या मंदिरात परशुरामाने अयप्पाची मूर्ती मकर संक्रांतिदिवशी स्थापन केली. भारतात जेवढी अयप्पा मंदिरे आहेत त्याची बांधकाम शैली दाक्षिण्यात्य पद्धतीची आहे.

Leave a Comment