लेगो बॉक्सपासून बनवली महागडी बुगाटी

lego
लहान मुलांचा खेळ लेगो बॉक्स पासून घरे, इमारती, प्राणी असे अनेक खेळण्याचे प्रकार बनविले जातात. चीन मध्ये या लेगो बॉक्स पासून जगातील सर्वात महागडी बुगाटी कायरॉल हि कार बनविली गेली असून ती शेनयांग शहरातील मॉल मध्ये डिस्प्ले केली गेली आहे. खऱ्या कारच्या आकाराची हि सुपरकार बनविण्यासाठी २ लाख ३० हजार लेगो बॉक्सचा वापर केला गेला असून तिचे वजन आहे ५२३ किलो.

अर्थात लेगो पासून बुगाटी बनविण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. चार आठवड्यापूर्वीच अशीच लेगो ब्लॉकपासून तयार करण्यात आलेली बुगाटी सादर केली गेली असून हि कार ड्राईव्ह करता येते. तिचा वेग ताशी १२ मैल आहे. ही कार बनविण्यासाठी १० लाख लेगो बॉक्स वापरले गेले आहेत आणि तिचे वजन आहे ३ हजार पौंड म्हणजे साधारण १२०० किलो.

Leave a Comment