अयोध्येत यंदाही दिवाळीचा भव्य दीपोत्सव

ayodhya-
गतवर्षी प्रमाणेच यंदाही रामाच्या अयोध्येत दिवाळीचा दीपोत्सव भव्य स्वरुपात केला जाणार असून ३ लाख पणत्यांनी अयोध्येच्या गल्ल्या, मंदिरे, घात उजळणार आहेत. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर गतवर्षी पासून अयोध्येतील दिवाळी ग्लोबल ब्रांड बनविण्यासाठी पर्यंत सुरु झाले असून हि दिवाळी पाहण्यासाठी देशी विदेश पर्यटक गर्दी करत आहेत आणि त्यामुळे अयोध्येचे पर्यटन स्थळ होण्यास हातभार लागला आहे.

यंदा ४ ते ६ नोव्हेंबर या काळात दिवाळी साजरी केली जात असून या काळात अयोध्या नगरी पणत्यांनी झगमगून उठेल. त्यासाठी स्थानिक कुंभाराकडून पणत्या खरेदी केली जाणार आहे. तिन्ही दिवस रामलीला आयोजित केली जाणार असून त्यात भारताबरोबर श्रीलंका, रशिया, इंडोनेशिया, लाओस आणि मलेशियातील रामलीला पथकेही सामील होणार आहेत. हेलिकॉप्टर मधून राम सीता आणि लक्ष्मण यांचे आगमन होणार असून मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी याच्यासह उत्तर प्रदेशचे अनेक मंत्री त्यांचे स्वागत करणार आहेत. या निम्मित लेझर शो आयोजित केला जाणार असून त्यातून रामाचे जीवन दर्शविले जाणार आहे.

Leave a Comment