अॅस्टन मार्टिनची स्वस्त वेन्टेज कार भारतात लाँच

aston
ब्रिटीश ऑटो कंपनी अॅस्टन मार्टिनने त्यांची सर्वात स्वस्त लग्झरी कार वेन्टेज भारतात लाँच केली असून त्याचे बुकिंग सुरु झाले आहे. या कारची किंमत २ कोटी ९५ लाख रुपये आहे. बुकिंग नंतर २ ते ४ महिन्यात तिची डिलिव्हरी दिली जाणार आहे. ही नवी वेन्टेज मागील वेन्टेजच्या तुलनेत वजनाला हलकी आणि अधिक मजबूत आहे.

या कारचे डिझाईन नव्याने केले गेले असून त्त्याला नवीन रिअर सबफ्रेम दिली गेली आहे. कारचे वजन १५३० किलो असून केबिन अधिक प्रशस्त आहे. स्पोर्ट, स्पोर्ट प्लस आणि ट्रॅक ओन्ली अश्या तीन ड्रायविंग मोड मध्ये असलेली हि कार ० ते १०० किमीचा वेग ३.५ सेकंदात घेते. तिचा टॉप स्पीड आहे तशी ३१५ किमी. या कारला ४.० लिटरचे एएमजीचे ट्वीन टर्बो व्ही ८ इंजिन दिले गेले आहे.

Leave a Comment