छत्तिसगढचे खजुराहो, भोरमदेव मंदिर

bhoram
छत्तीसगड मधील कबीरधाम जिल्ह्यातील मेकल पर्वत रांगात निसर्गरम्य ठिकाणी असलेले भोरमदेव मंदिर हे छत्तिसगढचे खजुराहो म्हणून प्रसिद्ध आहे. हिरव्यागार जंगलात, खडकात केलेल्या अप्रतिम कोरीवकामामुळे हे मंदिर पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. हे मंदिर शिवमंदिर असून ११ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. नागर शैलीत हे मंदिर बांधले गेले आहे. गोंड आदिवासी याचा देव भोरमदेव याच्या नावाने ते बांधले गेले आहे.

bhoram1
अतिशय देखणे असे हे मंदिर राजपूत काळात लक्ष्मणदेव राय याने बांधले असल्याचा शिलालेख येथे आहे. नागवंशी राजा गोपाळदेव याच्या काळात त्याचे बांधकाम पूर्ण झाले असावे असे मानले जाते. मंदिराच्या भिंती, आतील खांब याच्यावर अतिशय सुंदर शिल्पे कोरली गेली असून त्यातील अनेक मिथुन शिल्पे आहेत. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर ५४ शिल्पे असून मुख्य मंदिर दोन भागात आहे. मंदिरासमोर शांत, सुंदर सरोवर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असले तरी पश्चिम दिशा सोडून तिन्ही दिशांना दारे आहेत. गर्भगृह, मंडप आणि अंतराळ अशी मंदिराची बांधणी आहे.

मंडपात १६ खांब असून या सर्व खांबांवर अनके प्रतीके कोरली गेली आहेत मात्र त्यातील एकही दुसऱ्यासारखे नाही. कळसाचा आकार उमलत्या कमळाप्रमाणे आहे. मंदिरातील शिवलिंग भव्य आणि सुंदर आहे. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असून ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी येथे भेट देण्यासाठी उत्तम असतो.

Leave a Comment