आयफोन आणि वनप्लस पेक्षा स्वस्त आहे ‘रियलमी’चा हा स्मार्टफोन

realme
मुंबई : ओप्पोचा सब-ब्रान्ड ‘रियलमी’ने अनेक महागड्या स्मार्टफोन्सला टक्कर देण्यासाठी आज आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. ‘रियलमी २ प्रो’ हा दमदार स्मार्टफोन केवळ स्वस्तच नाही तर याचे फिचर्सही शानदार आहेत. आज १२.३० वाजता फ्लिपकार्ट या शॉपिंग वेबसाईटवर या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. अद्याप या फोनच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही.

८ जीबी रॅमसहीत रियलमी २ प्रो स्मार्टफोन उपलब्ध असेल. यात स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर, अॅन्ड्रॉईड ओरियो ८.१ या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. यात वॉटरड्रॉप नॉच डिझाईन आणि व्हर्टिकल ड्युएल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी २ प्रोमध्ये ९१ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसोबत एक मोठी नॉच असेल. स्क्रीन साईज ६.३ असण्याची शक्यता आहे. मेटल आणि ग्लाससोबत, स्मार्टफोन डायमंड ब्लॅक फिनिशमध्ये डिझाईन करण्यात आला आहे. रियलमी २ प्रोची किंमत २०००० रुपयांहून कमी असण्याची शक्यता आहे. या किंमतीत ८ जीबी रॅमसोबत येणारा हा पहिला स्मार्टफोन असू शकतो.

Leave a Comment