यांच्या घरात नळातून पाण्याऐवजी चक्क वाहते बियर !

beer
खरेतर आपल्या आवडत्या वस्तूंच्या बाबतीत प्रत्येकाने काही ना काही कल्पना मनातल्या मनात केलेल्याच असतात. काहींना कधीही न संपुष्टात येणारे धन हवे असते, तर काहींना दररोज नवनवीन पोशाख हवे असतात. पण आपल्या सर्वच इच्छा आकांक्षा पूर्णत्वाला जातातच असे नाही. मात्र रशियातील अँड्री एरेमिव्ह या इसमाला, नळ उघडला की पाण्याऐवजी त्यातून बियर अखंड वहावी अशी इच्छा असल्याने त्याने तशी सोय आपल्या राहत्या घरामध्ये करून घेतली आहे. अँड्रीच्या घरामध्ये नळ उघडला की पाण्याच्या ऐवजी थंडगार बियर मिळत असल्याने मन मानेल तेव्हा आणि हवी तितकी बियर उपलब्ध असावी हे अँड्रीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
beer1
अँड्रीच्या घरातील बियरचा पुरवठा कधीच संपत नाही, कारण बियरच्या दुकानातून अँड्रीने एका पाईपलाईनमधून बियरचा अखंड पुरवठा होत राहील अशी व्यवस्था केली आहे. आता बियरचा पुरवठा अँड्रीच्या घरामध्ये अखंड सुरु असतो. बियरच्या दुकानातून खास पाईपलाईन अँड्रीच्या घरापर्यंत येऊन त्यांच्या घरामध्ये बियरचा पुरवठा सुरु होण्याच्या प्रक्रियेला काही अवधी लागला असला, तरी आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, मन मानेल तेव्हा थंडगार बियरचा आनंद अँड्री, त्यांचे परिवारजन आणि पाहुणेमंडळी घेऊ शकतात.
beer2
बियरच्या दुकानापासून ते घरापर्यंत बियरचा पुरवठा करणारी पाईपलाईन घालून घेण्यासाठी अँड्रीला अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागली. या कामासाठी अँड्रीला बियर कंपनीचे मालक, अँड्री राहत असलेल्या हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून कायदेशीर रित्या परवानगी घ्यावी लागून, सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले. बियरच्या दुकानापासून ते अँड्रीचा घरापर्यंत बियरचा पुरवठा करण्यासाठी दहा मीटर लांबीची पाईपलाईन घालण्यात आली आहे. या पाईपलाईन मधून ज्या बियरचा पुरवठा केला जातो, ते बियर सातत्याने एक सारख्या तापमानावर असावी, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे.

Leave a Comment