शृंगेरीचे प्राचीन शारदाम्बा मंदिर

sringeri
आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात स्थापलेले शृंगेरी येथील शारदाम्बा मंदिर हे अति प्राचीन मंदिर देशभरात शारदा पीठ म्हणून प्रसिद्ध आहे. तुंगभद्रा नदीच्या काठी असलेले शृंगेरी हिंदूंसाठी महत्वाचे तीर्थस्थान असून येथे शंकराचार्यांचा मठ आहे. शारदाम्बा मंदिर हे सरस्वती मंदिर असून येथे नवरात्र आणि दसरा या काळात भाविकांची प्रचंड गर्दी होते.

sharada
असे सांगितले जाते कि शंकराचार्य जेव्हा देशभ्रमण करत असताना शृंगेरी येथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथे एक अनोखे दृश्य पहिले. एक कोब्रा जातीचा नाग गर्भवती बेडकीला उन्हापासून वाचविण्यासाठी तिच्यावर फणा धरून संरक्षण देत होता. या दृश्याचा प्रभाव आदि शंकराचार्यांवर इतका पडला कि त्यांनी येथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि सरस्वती मंदिर स्थापन केले. शंकराचार्य येथे १२ वर्षे राहिले होते.

मंदिरातील सुरवातीची मूर्ती चंदनाची होती ती नंतर सोन्यात घडविली गेली. पाच पीठातील हे एक महत्वाचे पीठ मानले जाते. या परिसरात कालभैरव, दुर्गा, अंजनेय आणि कालीमाता याचीही मंदिरे आहेत. शारदाम्बा मंदिराचे बांधकाम संपूर्णपणे दगडात केलेले असून अतिशय सुंदर वास्तुशैलीचा तो नमुना आहे.

Leave a Comment