रिलायंस जिओच्या युजरसाठी लवकरच एक मोठी घोषणा अपेक्षित असून या युजरना सहा २०२० च्या मध्यापर्यंत ५ जी सेवा पुरविली जाईल असे मिडिया रिपोर्ट आहेत. २०१९ च्या दुसऱ्या सहामाहीत ५ जी स्पेक्ट्रम लिलाव केले जाणार आहेत. दूरसंचार विभाग सचिव अरुणा सुंदरराजन यांनी ५ जी स्पेक्ट्रम २०१९ च्या दुसरया सहामाहीत वाटप केले जातील असे सांगितले आहे.
रिलायंस जिओ युजरना सर्वप्रथम मिळणार ५ जी सेवा?
रिलायंस जिओने ५ जी सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑप्टीक फायबर नेटवर्कचे काम सुरु केले असुन त्यांचे एलटीइ नेटवर्क पुरे झाले आहे. यामुळे स्पेक्ट्रम मिळताच सहा महिन्याचा आत जिओ युजर ५ जी सेवा वापरू शकणार आहेत. हा सेवेसाठी ३ जी , ४ जी प्रमाणे दूरसंचार हार्डवेअर प्रगत करण्याचे गरज नाही कारण ही सेवा सॉफटवेअरच्या सहाय्यानेच दिली जाणार आहे. सरकारने प्रथम प्रायोगिक तत्वावर १ वर्षासाठी या सेवेचे परीक्षण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.