किती तासांची झोप घेतात या प्रसिद्ध, अतिव्यग्र व्यक्ती?

trumpd
जिवंत प्राण्यासाठी मग तो माणूस असो वा पशुपक्षी, झोप ही अतिआवश्यक गोष्ट आहे. असे म्हणतात कि माणसाला किमान ७ ते ८ तास झोप मिळत असेल तरच त्याचा मेंदू स्वस्थ राहतो आणि त्याच्या कामाची गुणवत्ता सुधारते. सुखाची झोप हि अनुभवण्याचीच बाब आहे. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना दिवसभरात अनेक तास सातत्याने काम करावे लागते. मोठ्या देशांचे प्रमुख, उद्योजक, सेलेब्रेटी, यशस्वी कलाकार अथवा मोठ्या हुद्द्यावर काम करणारे लोक किती तास झोप घेत असतील याचे कुतूहल आपल्याला नेहमीच वाटते. अश्याच काही बड्या लोकांच्या झोपेची हि माहिती.

जगाची महासत्ता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणी आहेतच पण यशस्वी उद्योजकही आहेत. ७० वर्षाचे ट्रम्प अगदी फिट आहेत आणि कामाच्या रगाड्याखाली त्यांना फक्त ३ ते ४ तासाची झोप मिळते. मात्र त्यांच्या मताने कमी झोप हेच त्याच्या यशाचे रहस्य आहे.

moddi
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही रोजचा कार्यक्रम अतिशय व्यस्त असतो. संपूर्ण देशाची जबाबदारी, शिवाय अनेक कार्यक्रम, कार्यालयीन काम, विदेश दौरे, रॅलीज, भाषणे यामुळे त्यांना दिवसाचे चोवीस तास कमीच पडतात आणि तरीही ते एकदम उत्साही असतात. पंतप्रधान दिवसातून जास्तीत जास्त ४ ते ५ तास झोपेसाठी काढू शकतात. पेप्सीच्या प्रमुखपदावरून नुकत्याच पायउतार झालेल्या इंद्रा नुयी भारतीय वंशाच्या असून त्याना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले गेले आहे. त्याही दिवसाकाठी ४ तास झोप घेतात.

shahrukh
बॉलीवूड किंग खान शाहरुख याचेही वेळापत्रक अतिशय व्यस्त असते. शुटींग, प्रमोशन, प्रवास, पत्रकार परिषदा अशी अनेक कामे त्याच्यामागे असतात. तोही दिवसातून ३ ते चार तास झोपतो. अॅपल इंकचा सीइओ टीम कुक रोज पहाटे साडे तीन ते पावणेचारच्या दरम्यान उठतो. रात्री झोपायला कधी कधी दोन वाजून जातात अश्या वेळी तो पहाटे साडेचारच्या सुमारास उठतो.

Leave a Comment