उज्जैनचे हे तीर्थस्थळ पिंडदानासाठी आहे प्रसिद्ध

ujjain
पितृपक्षामध्ये लोक आपल्या घरामध्ये श्राद्ध कर्म करतात आणि त्याचबरोबर पवित्र तीर्थ स्थळांवर पितरांच्या आत्मा शांतीसाठी तर्पण, पिंडदानही करतात. अनेक तीर्थ स्थळ आपल्या देशामध्ये पिंडदान, तर्पण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामधीलच एक ठिकाण उज्जैन येथील सिद्धनाथ तीर्थ आहे. प्रेतशीला तीर्थ असेही याला म्हणतात. दूरदूरवरून लोक येथे आपल्या पितरांचे तर्पण करण्यासाठी येतात. तीर्थ पुरोहित पंडा समितीचे अध्यक्ष पं. राजेश त्रिवेदी यांच्यानुसार येथे जवळपास १५० कुटुंबाशी संबंधित ७०० पुजारी तर्पण, श्राद्ध इ. कर्म करतात.
ujjain1
उज्जैनच्या भैरवगढ क्षेत्रामध्ये सिद्धनाथ तीर्थ आहे. क्षिप्रा नदीच्या काठावर असल्यामुळे याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. एक खूप मोठे वडाचे झाड या ठिकाणी आहे. सिद्धवट असे देखील याला म्हटले जाते. ज्याप्रमाणे प्रयाग आणि गया येथे अक्षयवटचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे उज्जैनचे सिद्धवट आहे. हे झाड मान्यतेनुसार स्वतः देवी पार्वतीने लावले आहे. धर्म ग्रंथानुसार याच ठिकाणी महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांची मुंज झाली होती. स्कंद पुराणातील अवंतिका खंडात या तीर्थाचे वर्णन आढळून येते.

येथील शिलालेखानुसार, हे तीर्थस्थळ नष्ट करण्याचा मुघलांनी खूप प्रयत्न केला परंतु त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले नाही. हे झाड कापून त्यावर लोखंडाचे तवे मुघल शासकांनी ठोकले परंतु वटवृक्ष त्या लोखंडाच्या तव्यांना फोडून पुन्हा हिरवेगार बहरले.

Leave a Comment