‘फेस लॉग इन’ फिचर आणण्याच्या तयारीत पेटीएम

paytm
नवी दिल्ली – पेटीएम हे अॅप डिजिटल पेमेंटसाठी सर्वांनाच परिचित असून आता हे अॅप ‘फेस लॉगइन’ हे नवे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. पेटीएम आपल्या एंड्रायड बीटा अॅपवर या फिचरचे प्रयोग करत असल्याची माहिती पेटीएम ब्रान्डची मालक वन९७ कम्यूनिकेशन्स या कंपनीने दिली आहे. पेटीएम युजर्स या नवीन फिचरचा वापर करुन केवळ फोनकडे पाहुन लॉग इन करू शकणार आहेत.

या फिचरद्वारे पेटीएम युजर्स अतिशय सुरक्षितपणे लॉग इन करू शकतील, असा दावा कंपनीने केला आहे. जवळपास १० हजार चेहऱ्यांवर या फिचरचे प्रयोग करण्यात आले. यामध्ये हे फिचर १०० टक्के अचुक ठरले आहे. हे नवे फिचर फिशिंग अटॅकपासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आमच्या एल्गोरिदमला युजर्ससाठी आणखी सोपे बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या फिचरमुळे पेटीएम आणखी सुरक्षित आणि गतीमान होईल. याशिवाय फिशिंग अटॅकपासूनही अॅपचे संरक्षण केले जाईल, अशी माहिती पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक एबोट यांनी दिली.

Leave a Comment