इन्फोसिसच्या मदतीने ऑस्टेलियन बँक डिजिटल

infosis
सॉफ्टवेअर क्षेत्रातील भारताची अग्रणी कंपनी इन्फोसिस ने मंगळवारी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एएमबी ही मिलिटरी बँक सह कंपनी एजवर्व सिस्टीमच्या फिनेकल क्लाऊड प्लॅटफॉर्मवर डिजिटल झाल्याचे हजरी केले आहे. कंपनीचे फिनेकल क्लाऊड सॉफ्टवेअर एएमबीला डिजिटल प्लॅटफॉर्मवर विश्वसनीय बँकिंग अनुभव देईल असा विश्वास इन्फोसिसने व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलियातील एएमबी मिलिटरी बँक सर्वात जुनी रक्षा वित्तीय संस्था असून ती लष्करातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना १९५९ पासून सेवा देत आहे. इन्फोसिसच्या नव्या सॉफ्टवेअरचा लाभ बँकेला व्यवसाय वाढीसाठी तसेच खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यायाने अधिक नफा मिळविण्यासाठी उपयुक्त बनवेल तसेच सुरक्षा, विस्तार क्षमतेत वाढ होण्यास हातभार लावणार आहे. या बँकेत दररोज किमान ४० हजार व्यवहार होतात पैकी २२ हजार कार्ड माध्यमातून होतात तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रोज सरासरी ७ हजार व्यवहार होतात.

Leave a Comment