बांधवगड मधील वाघ, अनोखी विष्णू मूर्ती आणि किल्ला

tiger
मध्यप्रदेशातील बांधवगड येथे व्याघ्रप्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानात मुख्यत्वे वाघ आणि अन्य वन्य प्राणी पाहायला जायचे हे गृहीत असले तरी येथे या व्यतिरिक्तही अनेक जागा अश्या आहेत कि त्यांना भेट दिल्याशिवाय बांधवगडची सहल अपूर्ण आहे. वाघांचे माहेरघर असलेले हे जंगल तेथील रहस्यमयी किल्ला आणि निद्रित विष्णूची प्रचंड मूर्ती यासाठीही प्रसिद्ध आहे.

vishnu
बांधवगडला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. या जंगलाला बांधवगड नावाच्या एका पहाडावरून नाव पडले आहे. असे सांगतात कि लंकेतून परतल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण येथे आले तेव्हा लंकेवर लक्ष ठेवण्याच्या महत्वाच्या कामाबद्दल रामाने लक्ष्मणाला गड बांधून दिला. तोच हा बांधवगड. बांधवचा अर्थ भाऊ. बांधवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली एक विष्णुमूर्ती निद्रिस्त अवस्थेतील असून अश्या विष्णू मूर्ती देशात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात. ही मूर्ती २ हजार वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. क्षीरसागरात विश्राम करत असल्याच्या पोझ मधील हि मूर्ती आहे.

killa
बांधवगड किल्ल्याबाबत अनेक दंतकथा आहेत. या किल्लायचा उल्लेख शिवपुराणात येतो. तर असेही सांगितले जाते कि रावाचा राजा व्याघ्रदेव याने हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर जाण्यासाठी एकच मार्ग असून तो जंगलातून जातो.

bhuyar
या किल्ल्यातून एक भुयार जाते ते थेट रेवा येथे निघते. असे म्हणतात कि रेवा राजा मार्तंडसिंग आणि गुलाबसिंग या किल्ल्याचा वापर गुप्त खलबते करण्यासाठी करत असत. जेव्हा अशी खलबते करायची वेळ येई तेव्हा ते भुयाराचा वापर करून किल्ल्यावर येत असत. या भागात विष्णूच्या १२ अवतारातील मूर्ती आहेत असेही सांगितले जाते. मात्र त्यातील विश्राम अवस्थेतील विष्णू प्रसिद्ध असून अनेक पर्यटक हि मूर्ती पाहण्यासाठी आवर्जून येतात.

Leave a Comment