नेस्ले इंडियाने त्याच्या भारतीय बाजारातील उत्पादनात वाढ करताना मंगळवारी मॅगी डिप अँड स्प्रेड हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. अगदी कमी स्निग्धांश असलेल्या दह्यावर हे उत्पादन आधारित असून ग्राहकांच्या चवीचा अभ्यास करून ते तयार केले गेले आहे. यात ८० टक्के दही आणि ३ टक्क्यापेक्षाही कमी स्निग्धांश असून विविध प्रकारच्या स्नॅक सोबत ते चटणीप्रमाणे खाता येणार आहे. यामुळे पदार्थांना एक आरोग्यपूर्ण स्वाद देता येणार आहे. सध्या हे उत्पादन चीज गार्लिक आणि जलापेनो साल्सा अश्या दोन स्वादात मिळणार आहे.
नेस्लेचे चविष्ट मॅगी डिप अँड स्प्रेड बाजारात दाखल
नेस्ले इंडियाचे प्रमुख अरविंद भंडारी या नव्या उत्पादनविषयी बोलताना म्हणाले, आत्ताच या उत्पादनाला ग्राहकांकडून चांगली मागणी येत आहे. सतत नवीन काही तरी हवे असणारया ग्राहकांची त्यामुळे तृप्ती होईल शिवाय त्यांना आरोग्यपूर्ण, चविष्ट पदार्थांचा स्वाद घेता येणार आहे. मॅगी डिप अँड स्प्रेड उत्पादनाने आम्ही नव्या सेगमेंट मध्ये प्रवेश केला असून हि उत्पादने ग्राहकांना पूर्ण नवा अनुभव देतील असा विश्वास आहे. नेस्ले स्वास्थ्य, पोषण, व तंदुरुस्ती यासाठी उच्च गुणवत्ता असलेली डेअरी उत्पादने देण्यासाठी वचनबद्ध आहे. नवीन मॅगी डिप अँड स्प्रेडची किंमत १५० ग्रॅमच्या पॅक साठी १५० रु. अशी आहे.