जर्मनीतील म्युनिचमध्ये भरतो जगातील सर्वात मोठा बियर फेस्टिव्हल

beer
म्युनिच – जर्मनीतील म्युनिच या शहरामध्ये जगातील सर्वात मोठा बियर फेस्टिव्हल साजरा केला जात आहे. येथे पाहिजे तेवढी बियर तुम्ही पिऊ शकता. कोणीही तुम्हाला अडवणार नाही. हा, पण तुमचे पैसे त्यासाठी जरूर खर्च होतील, पण तुम्हाला येथे एकापेक्षा एक भन्नाट बियरच्या चवींचा आस्वाद घेता येईल. ऑक्टोबरफेस्ट, असे देखील या फेस्टिव्हलला म्हटले जाते.
beer2
२२ स्पटेंबरपासून या फेस्टिव्हलला सुरूवात झाली असून हा फेस्टिव्हल पुढील १८ दिवस चालणार आहे. यामध्ये जवळपास ६.५० लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये १ लिटर बियरच्या बॅाटलची किंमत १३.११ डॉलर आहे. सर्वप्रथम १२ ऑक्टोबर १८१० मध्ये हा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला होता. तेथील राजा लिंगवूडच्या लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात पार्टी करण्यात आली होती, तेव्हापासून या फेस्टिव्हलला सुरुवात झाली. १९७० पासून समलिंगी व्यक्तींनाही यामध्ये सहभागी करुन घेण्यात येत आहे.
beer3
बव्हेरीया स्टच्युची निर्मिती हा फेस्टिव्हल पहायला येणाऱ्यांसाठी करण्यात आली होती. हा फेस्टिव्हल १८५४ आणि १८७३ मध्ये कॉलराची साथ पसरल्यामुळे बंद करण्यात आला होता. तसेच युद्धामुळे १८६६ आणि १८७० मध्ये देखील बंद होता. जर्मनीमध्ये बियर पीताना चीयर्स बोलण्याऐवजी प्रॉस्ट असे बोलतात. प्रॉस्ट म्हणताना एकमेकांशी नजरानजर झाल्यामुळे सेक्स लाईफ चांगली होते अशी भावना आहे.

Leave a Comment