भारतात तक्रार अधिकारी नेमणार व्हाट्सअॅप

whatsapp
समाजात अशांतता पसरविणाऱ्या संदेशांवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाे व्हाट्सअॅपने आणखी एक पाऊल टाकले असून कंपनी भारतात तक्रार अधिकारी नियुक्त करणार आहे. याद्वारे बनावट बातम्यांना आशा घालण्यासोबतच चिंता आणि तक्रारी मांडण्याची संधी वापरकर्त्यांना मिळणार आहे.

जमावाद्वारे मारहाण करून लोकांच्या जीव घेणाऱ्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. यामागे व्हाट्सअॅपवर फिरणाऱ्या संदेशांचा मोठा हात आहे, असे भारत सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी व्हाट्सअॅपने अशा संदेशांना आळा घालावा, असेही सरकारने कंपनीला सांगितले होते. त्यामुळे कंपनीवर कारवाई करण्यासाठी दबाव आला आहे.

व्हाट्सअॅप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. सरकारच्या मागणीची पूर्तता करत भारतासाठी तक्रार अधिकारी नेमण्यात आला आहे, असे कंपनीच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

कोमल लाहिरी असा या अधिकाऱ्याचे नाव असून वापरकर्ते त्यांच्याकडे मोबाईल अॅपद्वारे मदत मागू शकतात, ईमेल पाठवू शकतात किंवा त्यांना पत्र पाटवू शकतात, असे या अपडेटमध्ये म्हटले आहे. या संदर्भात व्हाट्सअॅपच्या प्रवक्त्याने काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला परंतु कंपनीच्या संकेतस्थळावर या तपशिलांचा समावेश असलेल्या एफएक्यूकडे निर्देश केला, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

लाहिरी यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्या व्हाट्सअॅपच्या जागतिक ग्राहक ऑपरेशन्स आणि लोकलायझेशन वरिष्ठ संचालक आहेत. त्यांची नियुक्ती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment