ऑडिओ स्ट्रिमिंगची सुविधा घेऊन येत आहे गुगल

google
सॅन फ्रॅन्सिस्को – रोज नवनवे बदल डिजिटल जगतात दिसून येत असून आता आपल्या ग्राहकांसाठी ऑडिओ स्ट्रिमिंगची सुविधा इंटरनेट जगतातील आघाडीचे सर्च इंजिन म्हणून नावलौकिक मिळवलेले ‘गुगल’ घेऊन येत आहे. त्याचबरोबर यू ट्यूबवरिल डाउनलोडिंग गुणवत्तेतही आता अनेक बदल दिसून येणार आहेत.

हे बदल नविन पर्यांयासह दिसून येतील. आता सेटींग्ज आणि डाऊनलोड मेन्यूमध्ये कमी, मध्यम आणि उच्च पातळीवरील आवाजात अधिक लवचिकता येणार असून हे बदल ग्राहक हित आणि इंटरनेट डाटाची मर्यादा लक्षात घेता करण्यात आले आहेत, असे गुगलच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

ग्राहकांना या नव्या बदलांमुळे डेटा प्लॅन आणि डिव्हाईस स्टोरेज क्षमतेमध्ये बचत करता येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा गुगल तर्फे करण्यात आली. या बदलांचा लाभ अँड्राईडच्या नविन अद्यायावत आवृत्तीवर घेता येणार आहे.

Leave a Comment