वॉटर रीटेन्शन टाळण्यासाठी आजमावा हे उपाय

Retention
जर शरीरामध्ये काही अंतर्गत समस्या असेल, तर आपले शरीर काही प्रमाणामध्ये पाणी साठवू लागते. यामुळे शरीरावर, विशेषतः हात-पाय आणि चेहऱ्यावर हलकी सूज दिसू लागते. या स्थितीला एडीमा असे म्हटले जाते. शरीरामध्ये साठत असलेले अतिरिक्त पाणी नाहीसे व्हावे याकरिता उपायोजना करताना, वैद्यकीय सल्ला घेऊन ते पाणी का साठत असावे, याचे कारण प्रथम शोधून काढणे आवश्यक आहे. शरीरामध्ये साठणाऱ्या पाण्यामुळे येणारी सूज कमी होईल यासाठी औषधोपचार घेण्यापेक्षा, ही परिस्थिती ज्या कारणामुळे उद्भविली, त्यासाठी औषधोपचार घेणे आवश्यक आहे. आवश्यक त्या उपचारांसोबतच शरीरामध्ये अतिरिक्त पाणी साठू नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अगत्याचे आहे.
Retention1
अतिरिक्त पाणी साठल्याने शरीरावरील सूज कमी व्हावी या करिता आहारातील मिठाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. पॅकेज्ड अन्नपदार्थ, चिप्स, वेफर्स, अश्या सारख्या पदार्थांमध्ये तसेच लोणची, पापड यांसारख्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळ अश्या पदार्थांचे सेवन मर्यादित असावे. साध्या मिठाच्या ऐवजी सैंधव किंवा समुद्री मिठाचा उपयोग जास्त करावा. अतिरिक्त पाणी शरीरातून बाहेर टाकले जावे याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे व्यायाम. व्यायाम केल्यानंतर शरीरातील अतिरिक्त पाणी घामावाटे बाहेर दिले जाते. या पाण्यासोबत शरीरामध्ये साठलेली विषारी द्रव्ये देखील बाहेर टाकली जातात. पण व्यायाम करताना एखाद्याच दिवशी व्यायाम न करता दररोज थोडा व्यायाम नियमित केला जावा.
Retention2
आहारामध्ये भरपूर ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश असावा. तसेच जेवणापूर्वी अर्धा तास कोमट पाण्यातून एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घेतल्यानेही शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडण्यास मदत होते. हे व्हिनेगर दिवसातून दोन वेळा घेतल्याने उत्तम लाभ होतो. सायडर व्हिनेगर ऐवजी एक चमचा बडीशेप पाण्यामध्ये उकळून घेऊन या पाण्याचे सेवन केल्यास ही लाभ होतो. पाणी उकळताना त्यामध्ये बडीशेप घालावी, हे पाणी काही मिनिटे उकळू द्याचे. त्यानंतर हे पाणी थंड करून गाळून ठेवावे. दिवसातून तीन वेळा या पाण्याचे सेवन करावे.
Retention3
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्यातून लिंबाचा रस घेतल्याने फायदा होतो. या रसामुळे शरीरातील अतिरिक्त पाण्यासोबत घातक, विषारी पदार्थही बाहेर टाकले जातात. या पाण्यामध्ये नैसर्गिक, ‘अनप्रोसेस्ड’ मध घातल्याने ही लाभ होतो. या पाण्याचे सेवन दररोज करणे चांगले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment