अटळ मृत्यूविषयी काही खास माहिती

mrutyu
जगात सर्वात शाश्वत काय या प्रश्नाचे उत्तर आहे मृत्यू. जो जन्माला आला त्याला मृत्यू येणारच पण नेमका तोच कुणाला नको असतो. माणसाला सर्वात अधिक भीती कशाची वाटत असेल तर ती मरणाची. मृत्यूविषयी जगभरात विविध प्रकारची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे आणि नियमित होत असते. त्यातील काही माहिती आपल्याला नक्कीच वाचावीशी वाटेल.

yuddha
एका आकडेवारीनुसार पहिल्या महायुद्धात ४ कोटी तर दुसऱ्या महायुद्धात ६ कोटी लोक मारले गेले होते. डॉक्टरच्या खराब हस्ताक्षरामुळे दरवषी जगात ७ हजार लोक मरण पावतात. डॉक्टरने काय लिहिले आहे हे न समजल्याने चुकीची औषधे दिली जातात त्यामुळे हे मृत्यू घडतात. भारतात दर तासाला १ महीला हुंडाबळीची शिकार होते. पृथ्वीपेक्षा पाण्यात मृतदेह सदन्याचे प्रमाण चार पट अधिक असते.

coconut
एक आकडेवारी सांगते दरवर्षी नारळ डोक्यात पडल्याने १५० मृत्यू होतात. दरवर्षी शार्क माश्यांमुळे १२ माणसे ठार होतात तर आपण दरवर्षी सरासरी ११ हजार शार्क माश्यांची शिकार करतो. ज्या रोगांवर सहज उपचार करता येतात अश्या रोगांमुळे दरवर्षी सरासरी ४ लाख लोक जीव गमावतात. डाव्या हाताने लिहिणाऱ्या व्यक्ती उजव्या हाताने लिहिणाऱ्यापेक्षा तीन वर्षे अगोदर मरतात असेही म्हणतात.

budhapa
वार्धक्य हे मृत्यूचे कारण कधीच नसते तर वार्धक्यामुळे होणारे रोग हे खरे कारण असते. पहाटे ३ ते चार या वेळेत आपले शरीर सर्वाधिक कमजोर असते त्यामुळे झोपेत मृत्यू आल्यास याच वेळेत तो येण्याची अधिक शक्यता असते. माणसाचे डोके कापले गेले तर त्यानंतर तो २० सेकंद जिवंत राहू शकतो पण हेच डोक्यात गोळी घातली तर त्वरित मरतो.

एका आकडेवारीनुसार तुमचा मृत्यू ज्यादिवशी होतो त्याचदिवशी जगभरात १ लाख ५९ जजर ६३५ लोक मरण पावतात.

Leave a Comment