मोदींनी उद्घाटन केलेल्या सिक्कीम विमानतळाची वैशिष्टे

sikkim
देश विदेशातील पर्यटकांचे आवडते स्थळ असलेल्या सिक्कीम राज्याला ९ वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर विमानतळाची सुविधा मिळाली असून या पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. या विमानतळाचा पाया ९ वर्षापूर्वी घातला गेला होता आणि आता हा विमानतळ देशातील १०० वा कार्यान्वित विमानतळ बनला आहे. राजधानी गंगटोक पासून ३० किमी वर हा विमानतळ असून त्यामुळे सिक्कीमला येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे.

या विमानतळाची काही खास विशिष्टे आहेत. २०१ एकर जागेत आणि समुद्रसपाटीपासून ४५०० फुट उंचीवर डोंगरांमध्ये हा विमानतळ बांधला गेला आहे. त्यासाठी ६०५.५९ कोटी रुपये खर्च केला गेला आहे. चीनच्या सीमेपासून तो अवघा ६० किमीवर आहे आणि या विमानतळाच्या बांधकामात जिओ टेक इंजिनिअरींग तसेच स्लोप स्टॅबिलायझेशन तंत्राचा वापर केला गेला आहे. विमानतळाच्या गरजेनुसार माती बदलली गेली आहे.

विमानतळाचे अधिकृत उद्घाटन हवाई दलाच्या डॉर्नअर २२८ विमानाने केले असले तर स्पाईसं जेटच्या प्रवासी विमानाने यापूर्वीच चाचणी घेतली होती. विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेलाही विमान प्रवास करता यावा यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या उडान मोहिमेनुसार स्पाईस जेट २६०० रु. भाडे आकारून उड्डाणे करणार आहे. या विमानतळावरून लवकरच कोलकाता, गोहाटी तसेच भूतान, नेपाल आणि थायलंडसाठी उड्डाणे सूरु होणार आहेत.

Leave a Comment