खास ज्येष्ठांसाठी एमटेक कंपनीने आणला साथी फिचर फोन

sathi
आजचे बहुतेक फोन युवा पिढीला लक्षात घेऊन बनविले जात असताना भारतीय कंपनी एमटेक ने ज्येष्ठ आणि अंध व्यक्तींना उपयुक्त असा नवा फोन साथी या नावाने डिझाईन केला असून तो १२९९ रुपयात फ्लिपकार्ट वर खरेदी करता येणार आहे.

या फोनची दोन खास वैशिष्टे आहेत. एक म्हणजे हा फोन ब्ल्यू टूथ दय्राल या फिचरसह आहे. यामुळे हा फोन कुठल्याची स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार असून स्मार्टफोन ला स्पर्श न करताही यावरून कुलालाही कॉल करणे अथवा कॉल घेणे शक्य होणार आहे. या फोनला अॅलर्ट फिचरही दिले गेले आहे. त्यानुसार औषधाची वेळ सेट करता येणार आहे. सुरक्षेसाठी फोन मध्ये एसओएस बटन दिले गेले आहे. त्यामुळे आणीबाणीची वेळ आली तर एक बटन दाबून कॉल करता येणार आहे.

साथीला १.८ इंची डिस्प्ले, ३२ एमबी रॅम, ३२ एमबी स्टोरेज, एसडी कार्डच्या सहाय्याने १६ जीबी पर्यंत मेमरी वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनला ०.३ एमपीचा रिअर कॅमेरा असून ड्युअल सीम आहे.

Leave a Comment