देशाच्या इतिहासात प्रथमच १०.७४ कोटी कुटुंबाना पंतप्रधान लिहिणार पत्र

ayushman
भारताच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान देशातील १० कोटी ७४ लाख कुटुंबाना पत्र पाठविणार असून हे परिवार महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी आहेत. रविवारी केंद्र सरकारच्या पंतप्रधान जनआरोग्य योजनेची सुरवात झारखंड येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली. या योजनेखाली देशातील ५० कोटी नागरिक या विम्याच्या कक्षेखाली येणार आहेत. त्यांना ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. या लाभार्थींची निवड सामाजिक, आर्थिक, धार्मिक जनगणना २०११ च्या यादीनुसार केली गेली आहे.

रविवारी या योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी याच्या हस्ते झाले त्यावेळी आयुष्मान भारत विमा योजनेचे महत्व आणि फायदे समजावून सांगणारे पत्र झारखंड मधील लाभार्थींना दिले गेले. असेच दोन पानी पत्र या योजनेच्या सर्व लाभार्थींना दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदी या पत्रात म्हणतात, कोणत्याची खर्च अथवा अडचणीची चिंता न करता आपल्याला आजारांवर योग्य उपचार या योजनेमुळे मिळतील अशी मला अशा आहे. यातून केवळ रुग्णालयाच्या खर्चातून आपल्याला मुक्तता मिळेलच पण चांगल्या आरोग्य सुविधाही मिळणार आहेत.

Leave a Comment