अभिनेत्री नीलमने का संपविले बॉबी देओल बरोबरचे आपले नाते?

combo3
१९९५ सालामध्ये अभिनेता बॉबी देओल याने ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. बॉलीवूडमध्ये नुकतेच पाऊल ठेवलेला हा ‘स्टार पुत्र’ सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करताच लोकप्रिय झाला. त्याच्या कारकीर्दीचा आलेख सर्वांच्या परिचयाचा असला, तरी या अभिनेत्याचे, अभिनेत्री नीलम हिच्या सोबत प्रेमसंबंध होते, हे तथ्य फारसे सर्वश्रुत नाही. त्यांचे ही नाते तब्बल पाच वर्षे सुरु होते. परंतु त्यानंतर १९९० सालच्या सुरुवातीला हे नाते संपुष्टात आले.
combo2
बॉबी देओल आणि नीलम यांनी आपल्या नात्याबद्दल कधीही कुठे वाच्यता केली नसली, तरी आता इतकी वर्षे उलटून गेल्यानंतर अभिनेत्री नीलम हिने या नातेसंबंधांच्या बद्दल आपले मन मोकळे केले. एका प्रसिद्ध सिने मासिकाला मुलाखत देताना नीलम बोलत होती. बॉबी आणि नीलमचे नाते संपुष्टात आल्यानंतर, आजवर या दोघांनी आपल्या नात्याबद्दल काहीही न बोलणेच पसंत केले. आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे आपल्याला पसंत नसून, आपल्या नातेसंबंधाची चर्चा आपण कधीच कुठे केली नसल्याचे नीलम म्हणाली.
combo1
नीलम आणि बॉबी वेगळे होण्यामागे आणखी एका अभिनेत्रीचा हात होता असे बोलले जात होते, मात्र वेगळे होण्याचा निर्णय नीलम आणि बॉबी यांनी, परस्परांचे विचार आणि मते लक्षात घेऊन घेतला असल्याचेही नीलम म्हणाली. नीलम आणि बॉबी यांचे प्रेमसंबंध पाच वर्षे सुरु असताना नीलमने बॉबीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. बॉबीबरोबर आपण कधीही आनंदी राहू शकणार नाही याची जाणीव झाल्यामुळे हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचे नीलम मुलाखतीमध्ये म्हणाली.
combo
आपले नाते संपुष्टात आणण्याच्या निर्णयाची नीलमला अजिबात खंत नसून, तिच्या आयुष्यातील हा सर्वात शहाणपणाचा निर्णय असल्याचे ती म्हणते. नीलम आणि बॉबी यांचे नाते संपुष्टात येण्यामागे बॉबीचे पिता अभिनेते धर्मेंद्र यांची या नात्याबद्दल असलेली नाराजी असल्याचेही बोलले जात होते. मात्र या गोष्टीत कोणतेही तथ्य नसून, हे नाते संपविण्याचा संबंध दोघांच्या परीवारांशी निगडित नसल्याचे नीलम म्हणाली. आपल्याला केवळ एक ‘स्टार पत्नी’ म्हणून आयुष्य जगणे मंजूर नसल्याने आपण हे नाते संपविण्याचा निर्णय घेतल्याचे नीलम म्हणते.