रुपयाची घसरण थांबविण्यासाठी रिझर्व बँक विकू शकते डॉलर्स

selldo
डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण थांबविण्यासाठी रिझर्व बँक अतिरिक्त २५०० कोटी डॉलर्स ची विक्री करू शकेल असे एसबीआयच्या इको रेपो अहवालात नमूद केले गेले आहे. मंगळवारी हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

या अहवालानुसार जून २००८ व मे २००९ मध्ये रुपया १३ टक्क्याने घसरला होता तेव्हा त्याची घसरगुंडी रोखण्यासाठी रिझर्व बँकेने ४३०० कोटी डॉलर्सची विक्री केली होती. तेव्हा भारताची परकीय गंगाजळी ३१२ अब्ज डॉलर्स होती. २०१७ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ६ टक्क्याने मजबूत झाला तर यंदा मात्र त्याची घसरण १५ टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे रिझर्व बँक डॉलर विक्रीचा निर्णय घेऊ शकते.

Leave a Comment