पंचामृत – पूजाविधीतील हा महत्वाचा घटक आहे आरोग्यदायी

panchamrut
घरात कुठलीही पूजा करायची असेल तर पूजेच्या तयारीत पंचामृत हा महत्वाचा घटक असतो. पंचामृत बनविण्याची ठराविक पद्धत असते आणि ते प्राशन करण्याचीही एक पद्धत असते. हे पंचामृत प्रमाणात प्राशन केले तर ते आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरते.

पंचामृत दुध, दही, साखर, तूप आणि मध अशा पाच पदार्थांपासून बनविले जाते. त्यात तुळशी आणि गंगाजल घातले जाते. पंचामृताशिवाय कोणत्याच विष्णुरुपाची पूजा पूर्ण होत नाही. नियमानुसार पंचामृत सूर्यास्त होण्याअगोदर तयार करावे लागते. यासाठी वापरले जाणारे दुध गाईचे असेल तर ते अधिक चांगले. या पंचामृतात चांदीचे नाणे अथवा शाळीग्राम घातला जातो. यामागे हरीला स्नान घालणे हि भावना असते.

पंचामृत प्राशन करताना ते दोन्ही हात एकाखाली एक धरून घ्यावे आणि ते प्राशन केल्यावर हात डोक्याच्या माथ्याला लावावेत. पंचामृत प्राशनाने शरीर पुष्टी होते. शरीरातील विषतत्वे बाहेर पडतात आणि मनशांती मिळते. ते तणाव दूर करण्याशी उपयोगी आहे.

यातील दुध शरीरासाठी पोषक असून मनाला शांतता देणारा घटक आहे तर दही पचनक्रिया मजबूत बनविणारे आणि एकाग्रता साधणारे आहे. दह्यामुळे त्वचा आणि चेहरा कांतीवान बनतो. मध शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणारा आहे. तसेच नात्यांना बळकटी देणारा आहे. साखर उर्जा वाढविते आणि आळस कमी करते तसेच झोपेच्या समस्या दूर करते. तूप बाल देणारे असून हाडे मजबूत करते आणि डोळ्याचे तेज कायम राखते. मात्र पंचामृत आवडते म्हणून खूप घेऊ नये तर पळीत मावेल इतकेच दोन वेळा घेतले पाहिजे.

Leave a Comment