हरसिद्धी माता मंदिर नवरात्रीसाठी सज्ज

harsiddhi
भारतात दुर्गेची ५२ शक्तिपीठे आहेत त्यातील १३ वे शक्तीपीठ म्हणजे उज्जैन येथील हरसिद्धीमाता मंदिर. हे अति प्राचीन मंदिर नवरात्राच्या उत्सवासाठी सज्ज झाले असून येथे नवरात्रात भाविकांची प्रचंड गर्दी होते. हरसिद्धी मंदिरातील वैशिष्टपूर्ण दीपमाला नवरात्र काळात पूर्णपणे प्रज्वलित केल्या जातात आणि त्यासाठी भाविक पैसे भरून नोंदणी करतात. सामुहिक पद्धतीने हि नोंदणी केली जाते आणि २१०० रु. भरून हि नोंदणी करावी लागते.

Untitled-1
हे मंदिर प्राचीन असून राजा विक्रमादित्य या देवीचा एकनिष्ठ भक्त होता. असे सांगितले जाते कि राजाने ११ वेळा त्याचे मस्तक कापून देवीच्या चरणावर वाहिले पण दरवेळी देवीने त्याला जिवंत केले. या मंदिरात श्रीयंत्र असून त्याच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात. येथे शिवमंदिरही आहे आणि त्याला करकोटकेश्वर महादेव असे म्हणतात. हे मंदिर ८४ महादेवांपैकी एक असुन येथे कालसर्प दोषाचे निवारण केले जाते.

मंदिरात गाभारयासमोर असणाऱ्या दोन दीपमाला मराठा कालीन असून त्यात प्रत्येकी ५०० दिवे आहेत. नवरात्रात चार लोक चार तास परिश्रम घेऊन आणि ४ डबे तेल वापरून हे सर्व १ हजार दिवे प्रज्वलित करतात. त्यासाठी त्यांना रोज २१०० रु. मेहनताना दिला जातो. रात्रीच्या अंधारात या दिपज्योतींच्या प्रकाशात उजळलेले मंदिर पाहणे हा मोठा सुंदर अनुभव असतो.

Leave a Comment