माता-पित्यांनी विवाहानिमित्त असाही दिला हुंडा

gift
विवाहप्रसंगी वर-वधूंचे मित्रमंडळी, नातेवाईक, इतर प्रियजन यांनी वधू-वरांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. या सर्व मंडळींच्या बरोबरच वधू-वरांचे माता-पिता देखील नवदाम्पत्याला अनेक भेटवस्तू आशीर्वाद आणि शुभेच्छा म्हणून देत असतात. पण काही देशांमध्ये विवाहसोहोळे असे ही होते, ज्या ठिकाणी माता-पित्यांनी आपल्या मुलांना विवाहप्रसंगी दिलेल्या भेटवस्तू भलत्याच अजब असल्यामुळे उपस्थित पाहुण्यांच्या चर्चेचा विषय ठरल्या.
gift1
स्वच्छतेची आवड असणे चांगले असले, तरी त्यासाठी काही किलो साबण भेट म्हणून देण्याची कल्पना अजब आहे. फ्रान्समध्ये एका प्रसिद्ध हेअर ड्रेसरने आपल्या मुलीच्या लग्नामध्ये तिला, तिचे वजन भरेल इतक्या वजनाचे साबण भेट म्हणून दिले. या शिवाय त्याने आपल्या जावयाला अर्थातच इतर भेटवस्तूही भरपूर दिल्या. पण इतके साबण पाहून उपस्थित पाहुणे मंडळी बुचकळ्यात पडली नसती तरच नवल.
gift2
विवाहानिमित्त भेट म्हणून नाशपाती नामक फळ देण्यामागे स्कॉटलंड देशामध्ये एक प्रसिद्ध आख्यायिका आहे. येथे प्रचलित असणाऱ्या आख्यायिकेच्या नुसार, तेराव्या शतकामध्ये सर ह्युगो ड गिफर्ड नामक जादुगाराने आपल्या मुलीला तिच्या लग्नामध्ये एक जादुई नाशपाती भेट म्हणून दिली. मुलीने सासरी गेल्यानंतर या जादुई नाशपातीच्या रहस्याचा खुलासा केला. तिने सांगितले, की सासरी तिला जर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, तर ती जादुई नाशपाती नष्ट होईल. जर जादुई नाशपातीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचली तर सासरच्या सर्व परिवाराचे मोठे नुकसान होईल अशी ती जादुई नाशपाती असल्याचे मुलीने आपल्या सासरच्या मंडळीना सांगितले. स्कॉटलंड मध्ये मुलीला सासरी कोणत्याही प्रकारचा जाच होऊ नये यासाठी मुलीच्या लग्नामध्ये नाशपाती भेट म्हणून देण्याच्या परंपरेच्या मागे हीच आख्यायिका आहे.
gift3
चीन मधील अब्जाधीश उद्योगपती वू रुबियानो याने २०१२ साली आपल्या मुलीचा विवाह करविला. या निमित्त त्याने आपल्या जावयाला दिलेल्या भेटवस्तू पाहून उपस्थित पाहुणे मंडळींचे डोळे दिपले. या उद्योगपतीने नव दाम्पत्याला सोन्याच्या मोहोरांनी भरलेल्या चार भल्या मोठ्या पेट्या, भरपूर पैसा आणि अनेक आलिशान गाड्या भेट म्हणून दिल्या. याशिवाय आपल्या कंपनीतील काही शेअर्स देखील त्याने नवदाम्पत्याला भेट म्हणून दिले.

Leave a Comment