असे ही अजब मानसिक आजार !

disorder
आजच्या धावत्या युगामध्ये शारीरक आणि मानसिक तणाव प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनून राहिले आहेत. त्यामुळे नैराश्यापासून ते स्किझोफ्रेनिया पर्यंत अनेक मानसिक व्याधींचे वाढते प्रमाण जगभरामध्ये दिसून येत आहे. एक काळ असा होता, जेव्हा मानसिक व्याधींच्या बद्दल फारसे मोकळेपणाने बोलणे शक्य नसे. पण आता विविध सामाजिक आणि वैद्यकीय संस्था सतत जनजागृती करीत असल्याने मानसिक व्याधींच्याबद्दल पुढे येऊन बोलण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे मानसिक व्याधी कोणत्या प्रकारच्या असू शकतात, त्या कशामुळे उद्भवितात आणि त्यांची लक्षणे कमी कशी करता येतील याबद्दल अधिकाधिक माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. पण तरीही काही मानसिक व्याधी अश्या आहेत, ज्या अजूनही फारशा ऐकिवात नाहीत.
disorder1
जगातील सतत टक्के पुरुष ‘पारयुरेसीस’ या व्याधीने ग्रस्त आहेत. ही एक प्रकारची मानसिक व्याधी असून, हे पुरुष, त्यांच्या आसपास इतर कोणी असल्यास मूत्रविसर्जन करू शकत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक शौचालये वापरण्याच्या नुसत्या कल्पनेनेच या व्यक्ती अतिशय अस्वस्थ होतात. केवळ पुरुषांमध्येच नाही, तर महिलांमध्येसुद्धा ही व्याधी दिसून येते. या व्याधीची सुरुवात किशोरावस्थेमध्ये होते. या व्याधीमध्ये रुग्णाच्या शरीरामध्ये adrenalin कार्यान्वित झाल्याने मूत्राशयाचे तोंड अचानक बंद होते, व त्यामुळे लघवीचे उत्सर्जन करणे अशक्य होते.
disorder2
काही व्यक्तींमध्ये ‘बोअँथ्रोपी’ नामक व्याधी आढळून येते. ही व्याधी मानसिक असून या मध्ये रुग्ण गाई-म्हशींप्रमाणे व्यवहार करू लागतो. हे रुग्ण अनेकदा गायी-म्हशींप्रमाणे हातापायांवर चालताना दिसून येतात. या व्याधीचा उल्लेख प्राचीन इतिहासामध्येही सापडतो. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकामध्ये अस्तित्वात असलेल्या बॅबिलोनियन राज्याचा राजा लियो या व्याधीने ग्रस्त होता. या व्याधीमध्ये रुग्णाला आपण दुभते जनावर असल्याची भावना होते. ‘केरोफोबिया’ या मानसिक व्याधीमध्ये व्यक्ती जाणून बुजून आनंदी वातावरणापासून दूर राहते. या व्यक्तींना सतत नैराश्याने भरलेल्या मनस्थितीमध्ये रहाण्याने समाधान मिळते. आनंदी राहण्याची या व्यक्तींना एक प्रकारे भीती वाटते. आनंदी राहिल्याने आपल्याला काही ना काही अपाय होईल अशी या व्यक्तींची ठाम समजूत असते. तसेच आपण आनंदी राहिले तर त्यामुळे आपल्या प्रियजनांना अपाय होईल अशी भीती सतत या व्यक्तींच्या मनामध्ये असते. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक प्रसंगांमध्ये या व्यक्ती सहभागी होण्याचे टाळतात. आयुष्यामध्ये आधी केव्हातरी घडून गेलेल्या एखाद्या घटनेमुळे अश्या प्रकारची मानसिक व्याधी उद्भवू शकते.
disorder3
वारंवार स्मितहास्य करीत राहिल्याने ‘स्माईल मास्क सिंड्रोम’ ही व्याधी उद्भवू शकते. ही व्याधी अश्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आढळून येते, ज्यांना सतत चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवावे लागते. स्वागतकक्षातील कर्मचारी किंवा मोठमोठ्या स्टोअर्समध्ये काम करणारे कर्मचारी, हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटस् मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना ग्राहकांशी बोलताना चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवावे लागते. विशेषतः जपान देशामध्ये ही व्याधी जास्त आढळून येते. जपान देशामध्ये पाहुण्यांचे किंव ग्राहकांचे आदरातिथ्य सर्वतोपरी असल्याने तेथील कर्मचाऱ्यांमध्ये हे व्याधी आढळून आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment