आता अंतराळवीरांना अंतराळामध्येही घेता येणार शँपेनचा आस्वाद

Champagne
अंतराळामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्यामुळे सर्व वस्तू हवेमध्येच तरंगतात हे तथ्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे अंतराळामध्ये असताना कोणताही तरल पदार्थ बाटलीमधून ओतलाच, तर तो पदार्थ ग्लासमध्ये न पडता, त्याचे बुडबुडे हवेमध्ये तरंगू लागतात. पण तरल किंवा द्रव पदार्थांचे बुडबुडे बनून ते हवेमध्ये तरंगू नयेत आणि तो तरल पदार्थ अंतराळवीरांना सहज पिता यावा या दृष्टीने वैज्ञानिक निरनिराळे प्रयोग करीत होते. वैज्ञानिकांच्या प्रयोगांना आता यश येऊ लागले असून, लवकरच तरल पदार्थांचाच नाही, तर अगदी शँपेनचा देखील आस्वाद अंतराळवीरांना अवकाशायानामध्ये असतानाही घेता येऊ शकणार आहे.
Champagne1
शँपेन बाटलीमधून ओतल्यानंतर त्याचे बुडबुडे बनून हेवेमध्ये तरंगू नयेत या करिता वैज्ञानिकांच्या सल्ल्याने एक खास प्रकारची बाटली तयार केली गेली आहे. ही बाटली फ्रेंच इंटीरियर डिझायनर ओक्तेव्ह डी गाऊल तयार करीत आहेत. ‘द मम शँपेन हाउस’ च्या सहकार्याने ही बाटली तयार करण्यात येत आहे. अंतराळवीरांच्या सोबत, झीरो ग्रॅव्हीटी फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंसाठी देखील ही शँपेन उपलब्ध असणार आहे. सुप्रसिद्ध धावपटू युसेन बोल्ट यांनी नुकताच झीरो ग्रॅव्हीटी फ्लाईट मध्ये धावण्याचा आनंद घेतला असून, या प्रसंगी या खास शँपेनचे उद्घाटनही त्यांनी केले होते.
Champagne2
या शँपेनची बाटली तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे अंतराळामध्ये असताना ही शँपेन सहज ग्लासमध्ये ओतली जाऊ शकणार आहे. या शँपेनचा आस्वाद घेतानाची छायाचित्रे युसेन बोल्ट यांनी नुकतीच आपल्या सोशल मिडीयाच्या अकाऊन्टवर प्रसिद्ध केली आहेत.

Leave a Comment