जाणून घ्या जगभरामध्ये प्रचलित असलेली ही सौंदर्य रहस्ये

beauty
अस्सल मोती वापरून बनविलेल्या चूर्णापासून ते रिकाम्या पोटी लसूण खाण्यापर्यंत, सौंदर्य जपण्यासाठी अनेक देशांमध्ये अनेक उपाय आजमावले जात असतात. त्यामुळे जपानी महिलांसारखी सुंदर त्वचा असावी अशी इच्छा असल्यास, किंवा ब्राझील महिलांसारखी सुरकुत्या विरहित त्वचा हवी असे वाटत असल्यास, या महिला वापरत असलेले सोपे उपाय आपल्यालाही आजमावता येतील. चिली देशातील महिला लाल द्राक्षे कुस्करून त्यामध्ये गव्हाचे पीठ मिसळून त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावणे पसंत करतात. या उपायामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये अँटी ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणावर असल्याने यांच्या रसाने त्वचा, सुंदर नितळ बनते. त्वचेवरील काळसर डाग दूर होऊन त्यावरील मुरुमे पुटकुळ्या कमी होण्यासही मदत होते.
beauty1
जपान मध्ये तांदूळ हा तेथील भोजनाचा महत्वाचा भाग आहे. पण भोजनाव्यतिरिक्त तांदूळ भिजविलेले पाणी तेथे अनेक ब्युटी ट्रीटमेंटस् मध्ये वापरले जाते. या पाण्याच्या वापराने त्वचा अतिशय नितळ, सुंदर बनते. या पाण्यामध्ये जीवनसत्वे आणि क्षार मोठ्या प्रमाणावर असून, त्यामुळे त्वचेला उन्हामुळे झालेले नुकसान भरून येण्यास मदत होते, तसेच त्वचेवर आलेल्या वयस्कपणाच्या खुणा कमी होण्यास देखील मदत होते. हा उपाय आजमावण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन साफ पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे भिजवून ठेवावेत. या पाण्याचा वापर, चेहरा धुण्यासाठी करावा.
beauty2
ब्राझील देशामध्ये ओट्स ला सुपर फूड म्हटले गेले आहे. त्वचेवर हानिकारक अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा होणारा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा त्वचेवर सतत खाज सुटत असेलं तर ती कमी करण्यासाठी ओट्स उपयुक्त आहेत. ओटमील हा उत्तम स्कीन क्लेंजर आहे. याच्या वापराने त्वचेतील आर्द्रता टिकून राहून त्वचा मुलायम बनते. ओट्स वापरण्यासाठी थोडे ओट्स एका कपड्यामध्ये बांधून ती पुरचुंडी आंघोळीच्या काही वेळ पाण्यामध्ये घालून ठेऊन त्या पाण्याने स्नान करावे. उन्हामुळे त्वचेवर लाली आली असल्यास हा उपाय विशेष फायदेशीर आहे.
beauty3
चीन मध्ये अस्सल मोती वापरून बनविलेल्या चूर्णाचे मोठे महत्व आहे. हे चूर्ण अस्सल मोती वापरून बनविले जात असले तरी सामान्य माणसाला परवडेल अश्या दरामध्ये उपलब्ध असल्याने याचा सर्रास वापर पहावयास मिळतो. जे मोती ओबडधोबड आकाराचे असून, दागिन्यांमध्ये वापरले जाणे शक्य नसते, असेच मोती वापरून हे चूर्ण बनविले जात असल्याने हे फार महाग नसते. या चूर्णाच्या वापराने त्वचेमध्ये कोलाजेन वाढते. चेहऱ्यावरील डाग नाहीसे होऊन चेहरा उजळतो, आणि त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. हे चूर्ण लहान लहान कॅप्सुल्समध्ये उपलब्ध असते. हे वापरण्यासाठी एक कॅप्सूल थोड्या गुलाब पाण्यामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावावी.

Leave a Comment