पॅलेस ऑन व्हील्सचे १.३० कोटी भरून ऑस्ट्रेलियन प्रवाशांकडून बुकिंग

palace-on
गेली ३६ वर्षे शाही थाटमाटात प्रवाशांना शाही सफर घडवीत असलेल्या पॅलेस ऑन व्हील्स या लग्झरी ट्रेनचा प्रवास नवीन स्वरुपात ७ सप्टेंबरपासून सुरु झाल्यानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियातील ४१ पर्यटकांनी गाडीतील सर्व ८२ सीटचे बुकिंग केले असून त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये मोजले आहेत. सात दिवसांच्या या सफारीसाठी हि गाडी या ४१ पर्यटकांना घेउन धावणार आहे. प्रत्येक पर्यटकाने स्वतःसाठी डबल बेडरूम केबिन दुप्पट भाडे भरून घेतल्या आहेत.

सात दिवसात या गाडीतून ऑस्ट्रेलियन पर्यटक राजस्तानातील जयपूर, सवाई माधोपुर, चितोडगड, उदयपुर, जेसलमेर, जोधपुर, भरतपूर, आग्रा या शहरांचा प्रवास करतील. या ट्रेन मध्ये स्पा, जिम, बर, शाही बेड, शाही खान, पार्लर अश्या पंचतारांकित सुविधा आहेत. या ट्रेनचे भाडे सिझन प्रमाणे बदलते असते. ऑक्टोबर २०१८ ते २०१९ या सिझन साठी एक रात्रीला ६५० डॉलर्स असा दर आहे.

Leave a Comment