स्थानिक फिचर फोन उत्पादक कंपनी अॅडकॉमने गुरुवारी त्यांचा पहिला ए १ सिरीजमधला सेल्फी फिचर फोन सादर केला असून या फोनची किंमत आहे ७९० रुपये. या कंपनीने यापूर्वी ए १ सिरीज मध्ये बजेट फिचर फोन सादर केले असून एवन १५, एवन ०९, एक्स ४, एवन ११ अश्या नावानी बाजारात उपलब्ध असलेल्या या फोनच्या किमती ५०० रुपयापासून ८०० रुपयांपर्यंत आहेत.
अॅडकॉमचा सेल्फी फिचरफोन ७९० रुपयात
कंपनीचा एवन सेल्फी फोन हा पहिलाच सेल्फी फोन असून त्याला ड्युअल सिम, १.८ इंची डिस्प्ले, फ्रंट रिअर कॅमेरा, ८ जीबी पर्यंत वाढविता येणारी मेमरी, १०५० एएमएचची बॅटरी अशी फिचर आहेत. ब्लू टूथ, जीपीआरएस, म्युझिक, व्हिडीओ प्लेअर, एफएम रेडीओ, तसेच ओडीओ जॅकची सुविधाही त्यात दिली गेली आहे.