अमेझॉनवर मिळणार आरएसएसच्या दीनदयाळ स्वदेशीची उत्पादने

dindayal
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या दीनदयाळधाम स्वदेशी उत्पादन केंद्राची सुमारे २ डझन उत्पादने अमेझॉन इ कॉमर्स साईटवर उपलब्ध होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून दीनदयाळ केंद्राची आयुर्वेदिक औषधे, पंचगव्यावर आधारित उत्पादने, सुती कपडे अमेझॉनवर उपलब्ध होतील आणि ते ग्राहकांना घरपोच करण्यासाठी भारतीय टपाल माध्यमाचा वापर केला जाणार आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना दीनदयाळ केंद्राचे प्रमुख घनश्याम गुप्ता म्हणाले, १ आठवड्यापूर्वी अमेझॉन कंपनीबरोबर आमची चर्चा झाली असून आमच्या उत्पादनाच्या जाहिराती अमेझॉनच्या वेबसाईटवर लवकरच येतील. भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत माल पोहोचविला जाणार असून तसा करार पोस्ट विभागाबरोबर करण्यात आला आहे. टपाल विभाग देशाच्या कोणत्याची भागात १० दिवसांच्या आत डिलिव्हरी देणार आहे. सुरवातीला स्वास्थ्य, सौंदर्य, कपडे उत्पादने मिळतील व नंतर गोमुत्र, गोमय अश्या पंचगव्यापासून बनलेली औषधे, प्रसाधने तसेच पूजा सामग्री उपलब्ध केली जाणार आहे.

Leave a Comment