रामसागरपारा येथील आरोग्य गणेश प्रतिमा

arogya
आयुर्वेदाचे महत्व भारतीयांना ५ हजार वर्षांपासून माहिती आहे. रोग होऊ नयेत यासाठी काळजी घेताना व्याधींवर फक्त वनौषधीच्या सहाय्याने उपचार करणारी हि पद्धती. छत्तिसगढ राज्यातील रामसागरपारा येथील बाल गजानन गणेश मंडळाने यंदा वैशिष्टपूर्ण गणेश प्रतिमा साकारली असून ती ३८ प्रकारच्या विविध जडीबुटी मधून साकारली गेली आहे. शंकररुपात असलेल्या या गणेश प्रतिमेच्या पायाच्या नखापासून ते मस्तकावरी गंगेपर्यंत वनौषधीचाच वापर केला गेला आहे. यात माती अथवा कोणताही रंग वापरला गेलेला नाही.

या गणेश प्रतिमेतून हजारो वर्षे प्रचलित असलेल्या नैसर्गिक आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा वापर करण्याचा संदेश भाविकांना दिला गेला आहे. या पद्धतीचा वापर केलात तर रोग तुमच्या जवळ फिरकणार नाहीत असा विश्वास देण्याचा हा प्रयत्न आहे. हि प्रतिमा अतिशय सुंदर बनविले गेली आहे कि ती येथील भागात आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. या मंडळाचे हे ८ वे वर्ष असून त्यांनी नेहमीच इकोफ्रेंडली प्रतिमा बनविल्या आहेत. लाकूड, मोती, रुद्राक्ष, कवड्या, पेन्सिली, सुकामेवा, धान्ये यापासून या प्रतिमा बनविल्या गेल्या होत्या.

Leave a Comment