येतोय रेझर टू गेमिंग स्मार्टफोन

razer
खास गेमिंग साठी बनविला गेलेला रेझर टू लवकरच लाँच होत असल्याचे संकेत दिले गेले असून मिडिया रिपोर्ट नुसार हा फोन १० ऑक्टोबरला लाँच केला जाईल. नवा हँडसेट गतवर्षी सादर केलेला रेझरचे अपग्रेड व्हर्जन असल्याचे समजते.

या स्मार्टफोनला ५.७ इंची क्यूएचडी डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ चीपसेट असेल तसेच गेमिंग साठी याची रॅम ८ जीबीची असून इंटरनल स्टोरेज ६४ जीबी असेल. मायक्रोकार्डच्या सहाय्याने ते ४०० जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. या फोनला १२ + १२ एमपीचे दोन रिअर कॅमेरे आणि ८ इम्पिचा फ्रंट कॅमेरा असेल असेही समजते. अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस दिली जाईल. फोनची बॅटरी ४००० एमएएचची आहे. हा फोन साधारण ४५ हजार रु.मध्ये उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

Leave a Comment