जगभरात प्रसिद्ध असलेल्या तिळ्या बहिणी एकाचवेळी झाल्या प्रेग्नंट

triplet
मिनेसोटा – १२ डिसेंबर १९७७ साली जन्मलेल्या निकोल, एरिका आणि जैकलिन दाहम या तीन बहिणी तिळ्या आहेत. या तिघींना कोणी पाहिले तर पाहतच राहतो. या तिघींच्या चेहऱ्यापासून उंचीपर्यंत सर्वकाही सारखेच आहे. त्यामुळे लोकांना या तिघींना पाहिल्यानंतर धक्काच बसतो. विशेष म्हणजे या तिघींचे पूर्वज डीनएन टेस्टनुसार वेगवेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला यांच्या जीवनाची रंजक कहाणी सांगणार आहोत.
triplet1
या तिघी जॉर्डन, मिनेसोटामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. शाळेतही एकत्रच गेल्या. शालेय जीवनापासूनच तिघी प्रसिद्ध झाल्या. नेहमी या तिघी एकत्र असतात आणि एकच काम करतात. या तिघींनी शालेय शिक्षण, करिअरबरोबरच मुलांनाही एकत्रच जन्माला घातले.
triplet2
शिक्षणानंतर तिघींनी नर्सिंग कॉलेज जॉइन केले होते. एकत्रितपणे नर्सचे काम तिघींना करायचे होते. पण त्यादरम्यान या तिघींना एका मॅगझिनकडून मॉडेलिंगची ऑफर आली. तिघींचा सारखा लूक आणि सौंदर्य अनेक कंपन्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला. पाहता पाहता त्यांना येणाऱ्या ऑफर्स वाढल्या.
triplet3
या तिघींनी अनेक मॅगझिन आणि रियालिटी शोमध्ये एकत्र काम केले. काही रियालिटी शो तर यांच्यावरच तयार करण्यात आले होते. ते सुपरहिट ठरल्यानंतर त्यांना प्रसिद्ध इंटरनॅशनल मॅगझिन प्लेब्वॉयमधून ऑफर आली. डिसेंबर १९९८च्या मॅगझिनच्या बिग टेन एडिशनमधील त्यांचे ग्लॅमरस फोटो चर्चेचा विषय बनल्यामुळे त्यांना नर्सिंग कॉलेजमधूनही काढून टाकण्यात आले.
triplet4
ग्लॅमर इंड्स्ट्रीत तिघींना चांगला प्रतिसाद मिळत होता. तिघींनी त्यानंतर करिअर पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना यशही मिळाले. तिघींनी प्लेब्वॉय मॅगझिनच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, त्यांना ओळखण्यासाठी सोपे जावे म्हणून त्यांच्या बटवर आई वडिलांनी टॅटू काढले होते. जन्माच्या क्रमानुसार निकोलच्या शरिरावर एक, एरिकाच्या बटवर दोन आणि तिसऱ्या जॅकलिनच्या शरिरावर कोणाताही टॅटू नव्हता.
triplet6
ही तिकडी १९९९मध्ये बॉयो मिट्स वर्ल्डमध्ये एकत्र दिसली. त्या फॉक्स रियालिटी शो ”रेनोवेट माय फैमिली” मध्येही होत्या. त्या ‘द डॉक्टर्स’च्या अनेक एपिसोडमध्येही आल्या. हा शोही हिट ठरला. एरिकाची लव्ह स्टोरी त्याच दरम्यान सुरू झाली. तिचे या शोचे डायरेक्टर जे मैकग्रा यांच्याशी अफेयर सुरू झाले. नंतर दोघांनी लग्न केले.

तिघी बहिणी प्रत्येत कामाप्रमाणे प्रेग्नंटही एकाचवेळी झाली. २००९मध्ये तिघी प्रेग्नंट झाल्या आणि काही दिवसांच्या फरकाने २०१०मध्ये तिघींनी मुलांना जन्म दिला. पहिल्या क्रमांकाच्या निकोलने मायकल केलीशी लग्नानंतर १४ जानेवारी २०१० रोजी मुलीला जन्म दिला. एरिकाने मॅकग्राशी लग्नानंतर १८ मार्च, २०१०ला एका मुलीला जन्म दिला. तर तिसऱ्या क्रमांकाच्या जॅकलिनने बिली डोलनसी लग्न करून ३ फेब्रुवारी २०१०ला मुलीला जन्म दिला.
triplet7
‘द डॉक्टर्स’ शोमध्ये प्रसिद्ध झालेल्या दाहम सिस्टर्सची डीएनए टेस्ट झाली. त्यांच्या पूर्वजांबाबत माहिती असावी असे लोकांना वाटत होते. पण या टेस्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. पहिला खुलासा म्हणजे तिघींचे शरीर जवळपास ९० टक्के सारखे होते. म्हणजेच फिंगर प्रिंटही जवळपास सारखे आहेत. एक बहीण दुसऱ्या बहिणीच्या फिंगरप्रिंटने लॉक उघडू शकत होती. दुसऱ्या खुलाशावर कोणालाच विश्वास बसत नव्हता. तो म्हणजे तिघींचे पूर्वज वेगवेगळे असल्याचे समोर आले. एका बहिणीत ब्रिटिश एनसेस्टर्सचे प्रमाण जास्त होते, तर एका बहिणीत युरोपियन एनसेस्टरचे. डॉक्टरांनाही त्याने धक्का बसला.

Leave a Comment