सोनीने लॉन्च केले लाखमोलाचे दोन शानदार टीव्ही

sony
भारतामध्ये ब्राविया मास्टर मालिकेतील दोन शानदार टीव्ही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सोनीने लॉन्च केले आहेत. हे दोन टीव्ही ५५ इंच आणि ६५ इंचाचे असून या दोन्ही टीव्हीची नावे अनुक्रमे KD-55A9F आणि KD-65A9F अशी आहेत. OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याची विक्री २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तुम्हाला टीव्हीवरील दृष्य प्रत्यक्षात पाहिल्याचा भास होईल असे कंपनीने म्हटले आहे.

नेटफ्लिक्स, वॉइस सर्च, सेंटर स्पीकर यांसारखे अनेक फिचर्स ब्राविया OLED टीव्हीमध्ये देण्यात आले असून त्याचबरोबर हे टीव्ही अॅन्ड्रॉइड ओरियो ८.० ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यरत असतील. तसेच दोन्ही टीव्हीमध्ये एक्स १ अल्टिमेट इमेज प्रोसेसर आणि पिक्सल कॉन्ट्रॅस्ट बूस्टर हे फीचरही आहेत. ४के HDR10 चा सपोर्ट असल्यामुळे अत्यंत उच्चदर्जाची दृष्य पाहण्याची मजा घेता येईल.

यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 4.2, 4 HDMI पोर्ट्स, ३ युएसबी पोर्ट, हेडफोन जॅक आणि डिजिटल ऑडियो आउटपुट देण्यात आला असून टीव्हीमध्ये १६ जीबी स्टोरेज आहे. यात गुगल होम असिस्टंट आणि व्हॉइस कंट्रोलचे फिचर आहेत. घरातील इतर स्मार्ट उपकरणे देखील या टीव्हीद्वारे ऑपरेट करता येणार आहेत. माइक्रोफोन टीव्हीमध्ये इनबिल्ट असल्यामुळे तुम्हाला कोणता टीव्ही शो, सिनेमा किंवा जे पाहायचे असेल त्याचा केवळ आदेश द्यावा लागेल. ११ भारतीय भाषा आणि १४ आंतरराष्ट्रीय भाषांचा समावेश यात आहे. ५५ इंचाच्या टीव्हीची किंमत ३ लाख ९९ हजार ९९० रुपये आणि ६५ इंच टीव्हीची किंमत ५ लाख ५९ हजार ९९० रुपये आहे. येत्या काही वर्षांमध्ये महागड्या उत्पादनांमधून जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा कंपनीला आहे.

Leave a Comment