इंडोनेशियात पॉन फेस्टिव्हलदरम्यान ७ अनोळखी पुरुषांसोबत संबंध ठेवायला पत्नीला मुभा

pon-festival
इंडोनेशिया – इंडोनेशियात पॉन उत्सव खूप प्रसिद्ध असून महिला या फेस्टिव्हलमध्ये अनोळखी पुरुषांसोबत शारीरिक संबंध बनवतात. पण असे येथील स्त्रिया का करतात, ही प्रथा कशी पडली याची अनेकांना माहिती नाही. जगभरातून दरवर्षी या उत्सवासाठी लोक जमत असतात. खरेतर, त्यामागे कारण तेवढेच रंजक आहे.

इंडोनेशियातील बाली बेटावरही अशीच विचित्र परंपरा आहे. इंडोनेशियात दरवर्षी पॉन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण येथील सण थोडा विचित्र आहे, कारण या फेस्टिव्हलदरम्यान महिला अनोळखी पुरुषांसोबत संबंध ठेवू शकतात. या चालीरितीनुसार, असे मानले जाते की, एकमेकांच्या मनोकामना अनोळखी व्यक्तीशी संबंध बनवल्याने पूर्ण होतात. त्याचबरोबर वैयक्तिक जीवन आणि कुटुंबातील आनंद टिकून राहतो आणि घरात कलह होत नाही. ही प्रथा प्राचीन असल्याचे मानले जाते.
pon-festival1
इंडोनेशियात वर्षातून सात वेळा पॉन उत्सव साजरा केला जातो. फेस्टिव्हलच्या नियमानुसार दरवेळी नवे जोडीदार महिलांना निवडावे लागतात. विशेष बाब अशी की, येथील मान्यतेनुसार जोडीदार जुनाच निवडला तर मनोकामना पूर्ण होत नाही. दरवर्षी एक विशेष पर्वतावरच हा विचित्र पारंपरिक फेस्टिव्हल साजरा केला जातो. लोक येथे पोहोचून एकमेकांना आकर्षित करतात आणि मग तेथेच सर्वसंमतीने संबंधही ठेवतात. इंडोनेशियातील या पॉन उत्सवात नियमानुसार पुरुष अनोळखी महिलेला संबंध बनवल्यानंतर १० डॉलर देतात. परंतु काळाबरोबर या उत्सवात वेश्यावृत्तीचा शिरकाव झाला आणि येथील लोकांसमोर हे मोठे आव्हान बनले आहे. या उत्सवात आता मोठ्या संख्येने वेश्यासुद्धा सामील होत असल्यामुळे अनेकदा लोकांना गुप्तरोगांची लागण होते.
pon-festival2
पण असे असले तरीही, या उत्सवाची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. तज्ज्ञ सांगतात की, हा फेस्टिव्हल सामाजिक स्वास्थ्यासाठी फायद्याचा आहे. पण यावर अनेक जण टीकाही करतात. यामुळे प्रशासन या उत्सवाच्या कालावधीत येथे आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे काम करते.

Leave a Comment