दमदार बॅटरीचा मोटोरोला वन पॉवर भारतात लवकरच

motoone
चीनी कंपनी लेनोवोने मोटोरोला वन पॉवर हा नवा स्मार्टफोन २४ सप्टेंबरला भारतात सादर केला जात असल्याचे जाहीर केले असून त्याचा टीझर जारी केला आहे. अँड्राईड वनचा हा कंपनीचा दुसरा फोन असला तरी भारतातला पहिलाच फोन आहे. यापूर्वी मोटोरोला एक्स ४ अँड्राईड वन सह होता मात्र तो भारतात सादर केला गेलेला नाही. मोटोरोला वन पॉवर गेल्या महिन्यात आयएफए २०१८ मध्ये सादर केला गेला होता.

हा फोन ६.२ इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले, कस्टम इंटरफेस, अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस, ड्युअल रिअर कॅमेरा पैकी एक १६ एमपीचा तर दुसरा ५ एमपीचा, सेल्फिसाठी १२ एमपी कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५००० एमएएच बॅटरी अश्या फिचर सह आहे. हा फोन ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज तसेच ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज अश्या दोन व्हेरीयंट मध्ये आहे. दोन्हीमध्ये मेमरी २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. हा फोन १४ हजार रुपयांच्या दरम्यान मिळेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment