मोदींच्या बॉडीगार्डकडे असलेल्या ‘या’ ब्रीफकेसचा वापर ऐकून व्हाल चकित !

SPG
एसपीजी (Special Protection Group) वर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचची जबाबदारी असून तुम्ही नेहमी पाहिले असेल की, मोदींसोबत जे एसपीजीचे कमांडोज असतात. एक ब्रीफकेस नेहमी त्यांच्या हातात असते. पण या ब्रीफकेसमध्ये नेमके काय असते? याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

जी ब्रीफकेस घेऊन मोदींसोबत कमांडोज चालतात ती खरेतर एक पोर्टेबल बुलेट प्रूफ शील्ड किंवा पोर्टेबल फोल्डआउट बॅलिस्टिक शील्ड आहे. हल्ल्यादरम्यान जी उघडली जाऊ शकते. एनआयजी लेव्हल-३ ची सुरक्षा ही प्रदान करते. या ब्रीफकेसमध्ये एक गुप्त पाकीटही असते. ज्यात एक विशेष प्रकारचे पिस्तूल असते. पंतप्रधानांवर कोणताही हल्ला झाल्यास त्या स्थितीमध्ये बॉडीगार्ड ब्रीफकेसमधून गन काढून पंतप्रधानांना वाचवू शकतात.

पंतप्रधानांना हल्ल्याच्या वेळी सुरक्षित करण्यासाठी त्या शील्डला खालच्या बाजूने झटका दिला जातो, ज्यामुळे शील्ड उघडते. ही एक खास प्रकारच्या ढालसारखे काम करते. यामुळे कायम ही ब्रीफकेस हातात घेऊन एक बॉडीगार्ड पंतप्रधानांच्या आसपास वावरत असतो. जेथेही पंतप्रधान जातात, तेथे प्रत्येक पावलावर अचूक शूटर्स तैनात असतात. पंतप्रधानांच्या जिवाला धोका ठरू पाहणाऱ्यांना काही सेकंदांतच ठार करण्याची ताकद त्यांच्यात असते.

तब्बल ३ हजार जवान एसपीजीमध्ये आहेत. त्यांची जबाबदारी पंतप्रधान, एक्स-पीएम आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितता प्रदान करणे आहे. अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसच्या गाइडलाइनवर या जवानांना तयार केले जाते. ते FNF-२००० असॉल्ट राइफल, ऑटोमैटिक गन, १७एम रिवोल्वर्स यासारख्या मॉर्डन इक्विपमेंटने तैनात असतात. बेल्जियममधून इम्पोर्ट केलेली ३.५kg ची राइफल एसपीजी कमांडोजकडे असते. ती १ मिनिटात ८५० राउंड फायर करण्यात कॅपेबल असते. त्याची रेंज ५०० मीटरपर्यंत असते.

Leave a Comment