हे आहे भारतातील ‘संस्कृतग्राम’

sanskrit
संस्कृत भाषा ही भारतातील प्राचीनतम भाषांपैकी एक आहे. किंबहुना याच भाषेमधून इतर अनेक भाषांचा उगम झालेला आहे. पण कालांतराने ही भाषा लुप्त होत गेली आणि एके काळी दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी ही भाषा केवळ वेदाध्ययन आणि धार्मिक कार्यांपुरती मर्यादित राहिली. पण भारतामध्ये एक गाव असेही आहे, जिथे आजही संस्कृत भाषेचा वापर केला जातो. केवळ अध्यायानासाठीच नाही, तर दैनंदिन जीवनामध्ये देखील, येथील रहिवासी संस्कृत भाषा अस्खलित बोलू शकतात.
sanskrit1
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यामध्ये, शिमोगा पासून काहीच अंतरावर असलेले मात्तुर हे गाव भारताचे ‘संस्कृतग्राम’ म्हणून ओळखले जाते. येथील ग्रामस्थांनी दैनंदिन कारभाराची, संभाषणाची भाषा म्हणून संस्कृत भाषा स्वीकारलेली आहे. अगदी सर्व घरांतील परिवारजनांपासून, बाजरातील विक्रेत्यांपर्यंत सर्वच जन संस्कृत भाषेचा वापर करताना दिसतात. या गावातील पाठशाळेमध्ये वेदाध्यायानांचे ध्वनी कानी येत असतात. प्राचीन, कालबाह्य होत असलेल्या संस्कृत साहित्याचे, संगणकाच्या मदतीने पुनर्लेखन करण्याचे मोलाचे कार्य येथील विद्यार्थी करीत आहेत. येणाऱ्या पिढ्यांना देखील या साहित्याचा लाभ मिळावा हा त्यामागील हेतू आहे.
sanskrit2
या गावामध्ये प्रत्येक परिवारामध्ये उच्चशिक्षित सदय आहेत. गावातील प्रत्येक घरामध्ये इंजिनियरिंगची पदवी मिळविलेला एका तरी सदस्य आहेच. तसेच या गावातील तीस सदस्य संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मात्तुर गावाच्या जवळ असलेले होसाहाल्ली गाव देखील या गावाचाच दुसरा नमुना म्हणावे लागेल. तुंग नदीच्या किनारी वसलेल्या या गावामध्ये देखील संस्कृत भाषेचा वापर होतो.

Leave a Comment