द.आफ्रिकेच्या वाळवंटात पसरले रानफुलांचे गालिचे

flowers
कुणीही पर्यटनाला द. आफ्रिकेत जाणार म्हटले कि प्रथम वन्यजीव दर्शन हाच हेतू नजरेसमोर येतो. मात्र जंगली वन्य प्राण्यांप्रमाणेच येथील आणखी एक दृश्य अवश्य पहिलेच पाहिजे आणि ते म्हणजे येथील वाळवंटी तसेच निमवाळवंटी प्रदेशात फुलणारे रानफुलांचे ताटवे. हा परिसर सुंदर आणि असंख्य रानफुलांनी भरून जातो तो वसंताची चाहूल लागल्यानंतर. म्हणजे जुलाईच्या अखेरच्या आठवड्यात. हा रंगसोहळा अवघा एक ते दीड महिन्याचा असतो आणि तेथेही पर्यटक आवर्जून भेट देतात.

flowers1
द.आफ्रिकेतील केप टाऊन च्या पश्चिम आणि उत्तरेकडे असलेले एरवी ओसाड असणारे हे वाळवंटी भाग वसंतऋतूत जणू कात टाकतात आणि नजर जाईल तेथपर्यंत विविध रंगाच्या फुलांचे गालिचे येथे पसरलेले दिसतात.

flowers2
स्वच्छ मोकळे आकाश आणि क्षितीजरेषेवर दिसणारे डोंगर या निसर्गदृश्याला जणू चार चांद लावतात. लाल, पिवळी, पंढरी, जांभळी, केशरी, गुलाबी अश्या अनेक रंगाचे फुलांचे हे ताटवे नजरबंदी करतात. सप्टेंबर अखेरी उन्हाळा सुरु झाला कि हे वैभव ओसरू लागते मात्र फुले गळली तरी पुन्हा रुजण्यासाठी मातीत बिया टाकूनच ती आपला निरोप घेतात. पुन्हा पुढच्या वसंतात फुलण्यासाठी.

Leave a Comment