फेरारीची पोर्तोफिनो २८ सप्टेंबरला भारतात येणार

ferrari
फेरारीची नवी पोर्तेफिनो २८ सप्टेंबरला भारतात दाखल होत आहे. कंपनीने त्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित ही स्टायलिश कार इटली येथे गतवर्षी सादर केली होती. या कारचे नाव इटलीतील मच्छिमारांचे गाव पोर्तोफिनो वरून ठेवले गेले आहे.

स्पोर्टी लुकची ही नवी फेरारी स्टायलिश आहेच पण अधिक पॉवरफुल आणि वजनाला हलकी आहे. तिला एल शेप हेडलाईट देऊन अधिक देखणे बनविले गेले आहे. या हार्ड टॉप कन्व्हर्टिबल गाडीला ३.९ लिटरचे ट्वीन टर्बो व्ही ८ इंजिन दिले गेले असून तिचा टॉप स्पीड ताशी ३२० किमी पेक्षा अधिक असल्याचा कंपनीचा दावा आहे. फेरारी रेंज मधले हे पहिलेच जीटी मोडेल असून त्यात इलेक्ट्रो मेकॅनिकल स्टिअरिंग आहे.

१०.२ इंची टचस्क्रीन इंफोन्टेनमेंट सिस्टीम, १८ प्रकारे अॅडजस्ट करता येणाऱ्या सीट, पॅसेंजर साठी ८.८ इंची ऑप्शनल टच स्क्रीन, केबिन मध्ये हवा रोखणारे विंड डिफ्लेकटर दिले गेले असून भारतात मुंबई आणि दिल्ली येथील डीलर कडे या कार मिळू शकणार आहेत.

Leave a Comment