देना, विजया आणि बँक ऑफ बदोडाचे विलीनीकरण होणार

merger
केंद्र सरकारने बँकांना मजबुती देण्यासाठी सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार असल्याचे घोषणा अर्थसंकल्पात केली होती त्याला अनुसरून देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांचे विलीनीकरण लवकरच केले जाणार असल्याचे घोषणा करण्यात आली आहे. विलीनीकरणानंतर हे देशातील तिसरी मोठी सरकारी बँक बनणार आहे. काही महिन्यापूर्वी स्टेट बँकेत अन्य पाच बँका विलीन करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर हे पुढचे पाउल टाकले गेले आहे.

या संदर्भात सोमवारी वित्त सेवा सचिव राजीवकुमार यांनी माहिती दिली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकिंग क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी विलीनीकरण आवश्यक असल्याचे सांगून या विलीनीकरणामुळे बँकेतील कुणाही कर्मचाऱ्याला त्याचा त्रास होणार नाही तर त्याच्या सेवा अटी आहे तश्याच कायम राहतील असेही स्पष्ट केले आहे. विलीनीकरणामुळे बँकांची बुडीत कर्जे नियंत्रणात येतील आणि त्यांना नवीन कर्ज पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल असेही जेटली म्हणाले.

Leave a Comment