सुंदर आणि सुरक्षित शहर, बेलग्रेड

belgrade
पर्यटनासाठी परदेशात जायचे म्हटले कि सर्वसाधारणपणे युके, युएस, ऑस्ट्रेलिया यांना अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र जगभरात अनेक अशी ठिकाणे आहेत ज्याचा आपण आवर्जून विचार करू शकतो. सर्बियाची राजधानी बेलग्रेड हे असे एक शहर आहे. हे शहर स्वस्तात मस्त तर आहेच पण ते सुंदरही आहे आणि महिला वर्गासाठी अति सुरक्षितही.

bridge
या शहरातील मध्यवर्ती रिपब्लिक स्क्वेअर हे येथले खास ठिकाण. येथे स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. शॉपिंग, खाणेपिणे, फिरणे आणि मस्त मजेत मित्रमंडळासोबत रस्त्याकडेच्या बाकांवर बसून गप्पा मारणे आणि अलिप्त राहून रहदारी न्याहाळणे यात किती वेळ गेला हे समजणारही नाही. प्रिन्स मायकेलच्या या चौकात घोड्यावरचा पुतळा आहे. तसेच प्रसिद्ध नॅशनल म्युझियम आणि नॅशनल थियेटरच्या बिल्डींग आहेत. संध्याकाळ होऊ लागली कि चौकातील कारंजी रंगीबेरंगी होतात आणि येथील सौदर्यात कमालीचा रोमांच आणतात.

temple
उन्हाळात हाच परिसर अनेक रंगीबिरंगी फुलांनी नटलेला असतो. येथे अल्कोहोल स्वस्त मिळते तसेच मोठ्या संखेने असलेल्या नाईटक्लबमध्ये प्रवेश मोफत मिळतो. नव्या व जुन्या बेलग्रेडला जोडणारे सुंदर पूल, सवा आणि डॅन्यूब नदीचा संगम, बाल्कंसचे आर्थ्रोड्रोक्स मंदिर, अनेक इमारतीवर र्खातालेली म्युरल्स आणि स्ट्रीटआर्ट पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. येथे हॉटेल्स आणि होस्टेलचे अनेक पर्याय आहेत. शांत आरामदायी सुट्टी घालवायची असेल तर बेलग्रेड भेटीचा प्लान जरूर बनवा.

Leave a Comment