फ्लिपकार्ट फर्निचर बाजारात उतरणार

wooden
फ्लिपकार्टने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आता फर्निचर कॅटेगरी सुरु करण्यासाठी तयारी केली असून प्युअर वूड सब ब्रांड खाली हे फर्निचर विकले जाणार आहे. अमेझोन आणि आय्रिकाबरोबर त्यांना स्पर्धा करावी लागणार आहे. यासाठी कंपनीने विविध शहरातील फर्निचर उत्पादकांबरोबर करार केले असून त्यात जयपूर, जोधपुरच्या परफेक्ट होम या खासगी लेबलने हे फर्निचर विकले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अस्सल लाकडाचे हे फर्निचर ५ हजार ते ७० हजार अश्या किमतीच्या रेंजमध्ये येईल. ईकॉमर्स कंपन्या खासगी कंपन्यांच्या लेबलला अधिक प्राधान्य देत आहेत कारण त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. उत्पादक कंपन्या ई कॉमर्स कंपन्यांना जादा मार्जिन देत आहेत.

फ्लिपकार्ट मधील वरिष्ठ अधिकारयाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय फर्निचर बाजार १५ अब्ज डॉलर्सचा असला तरी त्यातील ९० टक्के हिस्सा असंघटीत आहे. मात्र येत्या एक दोन वर्षात ऑनलाईन फार्निचर खरेदी वाढणार असून त्यामुळे विकासाच्या संधी मोठ्या आहेत. अर्थात या व्यवसायात किंमत, दर्जा आणि फर्निचरचा टिकाऊपण याच्याशी तडजोड करून चालणार नाही हे मुख्य आव्हान आहे.

Leave a Comment