दोन परदेशी उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण

isro
भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून पीएसएलव्ही सी ४२ च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले असून हे उपग्रह पृथ्वीच्या हालचालींवर नजर ठेवणार आहेत. नोवा एसएआर आणि एसआय ४ अशी त्यांची नवे असून पीएसएलव्हीचे हे ४४ वे उड्डाण आहे. याप्रकारे उपग्रह प्रक्षेपित करून इस्रोने गेल्या ३ वर्षात ५६०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दोन उपग्रहांचे एकूण वजन ८९९ किलो आहे.

भारत जागतिक अंतराळ उद्योगात ३०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक हिस्सेदारीसह अग्रणी आहे. गेली काही वर्षे सर्वात कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम इस्रो करत असून पीएसएलव्ही सी ४२ चे हे पहिलेच पूर्ण व्यावसायिक उड्डाण आहे. पंतप्रधान मोदी यांनी इस्रोचे या कामगिरीबद्दल कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment